IPL 2023 : आजचा दिवस अर्जुनचा? MI vs KKR च्या प्लेइंग 11 वर एकदा नजर टाकाच

IPL 2023 : आयपीएलच्या नव्या पर्वामध्ये मुंबईचा आणखी एक सामना... संघात कुणाला स्थान मिळणार, यापेक्षा संघात अर्जुन तेंडुलकरला जागा मिळणार हा हाच क्रिकेटप्रेमींपुढचा प्रश्न. मुंबईच्या प्लेइंग 11 मध्ये कोणाला जागा मिळणार, कोण बाजी मारणार?

Updated: Apr 16, 2023, 01:10 PM IST
IPL 2023 : आजचा दिवस अर्जुनचा? MI vs KKR च्या प्लेइंग 11 वर एकदा नजर टाकाच title=
IPL 2023 news GT Vs RR Dream 11 Prediction Playing XI latest updates

IPL 2023 News : आयपीएलचं यंदाचं पर्व खेळाडूंच्या दमदार खेळीसोबतच आणखी एका कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. या चर्चा आहेत खेळाडूंमधील वादाभोवती फिरणाऱ्या. अनुभवी आणि काहीशा नवख्या तरीही गाजलेल्या खेळाडूंचं हे मानापमान नाट्य सुरु असतानाच आता आणखी एक सामना अवघ्या काही तासांत सुरु होणार आहे. आयपीएलच्या या 22 व्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) हे संघ या सामन्यात एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यामध्ये क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईच्या संघाला तूर्तास अपेक्षित यश मिळालेलं नाही. तीनपैकी एकाच सामन्यात मुंबईच्या संघाला विजयी होता आलं आहे. तर, कोलकाताच्या संघानं आतापर्यंत खेळल्या गेलेल्या चार सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. (IPL 2023 news MI Vs KKR Dream 11 Prediction Playing XI  latest update)

मागील सामना जिंकल्यामुळं मुंबईच्या संघाला आता कुठंतरी जिंकण्याचीच आस राहील, तर कोलकात्याचा संघ मागील सामन्याच मिळालेल्या पराभवाचा वचपा काढत पुन्हा विजयी सूर शोधताना दिसेल.

दोन्ही संघाची बेरीज, वजाबाकी...

सध्याच्या घडीला दोन्ही संघाच्या चांगल्या आणि वाईट बाजुविषयी सांगावं तर, मुंबईच्या संघाला फलंदाजांची फळी आणखी भक्कम करण्याची गरज अगदी स्पष्टपणे दिसत आहे. इशान किशनला अपेक्षित यश मिळताना दिसत नसून, सूर्यकुमार यादव गटांगळ्या खाताना दिसत आहे. तर, तिथे कोलकात्याचे फलंदाज तुफानी खेळाचं प्रदर्शन करत असले तरीही त्यांना गोलंदाजीमध्ये मात्र काही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हेसुद्धा वाचा : IPL 2023 : ‘आशू पा यांचा फोन आला आणि...’; गुजरात नव्हे, लखनऊची ऑफर आलेली म्हणत हार्दिकचा गौप्यस्फोट

वानखेडेमधील खेळपट्टी फलंदाजांपेक्षा धीम्या गतीनं गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना मदत करताना दिसणार आहे. राहता राहिला मुद्दा मुंबईच्या संघात या होम ग्राऊंडवर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला रोहित संघात संधी देणार का? तर, मुंबईच्या संघाची एकंदर स्थिती पाहता एक नवी खेळी करत संघात नवख्या खेळाडूंना स्थान दिलं जाऊ शकतं. त्यामुळं अर्जुनची वर्णी लागणार असं जाणकारांचं म्हणणं आहे.

संभाव्य प्लेइंग 11

Mumbai Indians

रोहित शर्मा(कर्णधार), इशान किशन, कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहाल वढेरा, जोफ्रा आर्चर, अर्शद खान, पियुष चावला, जेसन बेहरेनड्रॉफ

Kolkata Knight Riders

रहमनुल्लाह गुरबाज, एन जगदिशन, नितीश राणा, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरीन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती,