IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये आज 58 वा सामना खेळवला जाणार आहे. सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा आमने सामने येणार आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरोचा असणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स 11 पॉईंट्ससह पॉईंट टेबलमध्ये (Point Table) पाचव्या स्थानावर आहे. आजचा सामन्या जिंकल्यास लखनऊला पहिल्या चार क्रमांकात येईल. पण पराभव झाल्यास प्ले ऑफमधलं (Play Off) त्यांचं स्थान धोक्यात येऊ शकतं.
काहीशी अशीच परिस्थिती सनरायझर्स हैदराबादची आहे. आजच्या सामन्यात हैदराबादचा पराभव झाल्यास त्यांचं प्ले ऑफमधील आव्हान जवळपास संपुष्टात आल्यात जमा होईल. एडन मार्करमच्या (Adam Markram) नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबादने आतापर्यंत खेळलेल्या दहा सामन्यात 4 विजय तर 6 पराभव स्विकारले आहेत. म्हणजेच हैदराबादकडे आणखी चार सामने आहेत. पुढचे चारही सामने जिंकल्यास हैदराबादला प्ले ऑफमध्ये जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.
हिशोब बरोबर होणार?
लखनऊ सुपर जायंट्स आणि हैदराबाद सुपर जायंट्स या हंगामात दुसऱ्यांदा आमने सामने येतायत. हे दोनही पहिल्यांदा लखनऊमध्ये आमने सामने आले होते आता दुसरा सामना हैदराबादच्या होम ग्राऊंडवर होणार आहे. पहिल्या सामन्यात लखनऊने हैदराबादवर 5 विकेटने मात केली होती. त्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार मार्करम गोल्डन डक झाला होता. कृणाल पांड्याच्या (Krunal Pandya) गोलंदाजीवर तो क्लीन बोल्ड झाला. दुसरीकडे हैदराबादविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कृणाल ऑलराऊंडर म्हणून मैदानात उतरला होता. आता लखनऊचा कर्णधार म्हणून सामना खेळेल.
कृणालची कामगिरी घसरली
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. त्यामुळे कर्णधारपदी कृणाल पांड्याची नियुक्ती करण्यात आली. पण कर्णधारपदाची जबाबदारी खांद्यावर पडल्यापासून कृणालची कामगिरी घसरलीय. गुजराज टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात त्याने कर्णधारपद सांभाळलं, पण दोन्ही सामन्यात तो शुन्यावर बाद झाला. इतकंच नाही तर दोन्ही सामन्यात गोंलदाजीतही कमाल दाखवू शकलेला नाही.
आयपीएल पॉईंटटेबल (IPL Pointable)
आयपीएलमध्ये हैदराबाद वगळता इतर नऊ संघांचे जवळपास 11 ते 12 सामने झाले आहेत. पॉईंटटेबलमध्ये आता हार्दिक पांड्याचा गुजरात टायटन्स संघ 16 पॉईंट्सह पहिल्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स 15 आणि 14 पॉईंट्ससह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला पहिल्या स्थानावर असलेली राजस्थान रॉयल चौथ्या क्रमांकावर घसरली आहे. तर लखनऊ सुपर जायंट्स 11 पॉईंटसह पाचव्या क्रमांकावर आहे.