CSK vs RR : माहीने मारले पण हरले! राजस्थानकडून चेन्नईचा 3 रन्सने पराभव

शेवटच्या बॉलपपर्यंत खेळवलेल्या गेलेल्या या सामन्यात अखेर राजस्थानचा विजय झाला. राजस्थानने 3 रन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभ केला आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Apr 12, 2023, 11:44 PM IST
CSK vs RR : माहीने मारले पण हरले! राजस्थानकडून चेन्नईचा 3 रन्सने पराभव title=

IPL 2023 CSK vs RR : आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला होता. शेवटच्या बॉलपपर्यंत खेळवलेल्या गेलेल्या या सामन्यात अखेर राजस्थानचा विजय झाला. राजस्थानने 3 रन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभ केला आहे. रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी क्रिजवर असून देखील चेन्नईला सामना जिंकता आला नाही.

चेन्नईसमोर 175 रन्सचं आव्हान

चेन्नईचा किल्ला मानल्या जाणाऱ्या चेपॉक स्टेडियमवर आजचा सामना खेळवला गेला. या सामन्यात टॉस जिंकल्यानंतर कर्णधार धोनीने राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 175 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठाग करताना शेवटच्या बॉलपर्यंत चेन्नईने विजयासाठी झुंज दिली. मात्र धोनीच्या खेळीनंतरही टीमला 3 रन्सने पराभवाचा सामना करावा लागला.

जॉस बटरलने झळकावलं अर्धशतक

राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलरने 52 रन्स आणि देवदत्त पडिक्कलने 38 रन्स केले. याशिवाय अश्विन आणि हेटमायरने 30-30 रन्सचं योगदान दिलं. चेन्नई सुपर किंग्जकडून रवींद्र जडेजा, आकाश सिंग आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतले. तर मोईन अलीला एक विकेट मिळाली.

कॉन्वेचं अर्धशतक व्यर्थ

चेन्नईकडून डेव्हॉन कॉन्वेने 50, महेंद्रसिंग धोनीने 32 आणि अजिंक्य रहाणेने 31 रन्स केले. तर जडेजा 25 रन्स करून नाबाद राहिला. राजस्थानकडून अश्विन आणि चहलने यांना दोन-दोन विकेट्स काढण्यात यश मिळालं. तर एडम झाम्पा आणि संदीप शर्मा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. दरम्यान या विजयासह राजस्थानने पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे.