WTC साठी भारतीय संघाची घोषणा; अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी

Ajinkya Rahane : आयपीएल गाजवणाऱ्या क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याच्या हाती एक मोठी संधी आली असून, आता तो या संधीचं सोनं करणार का याकडे क्रिकेटप्रेमी आणि निवड समितीचंही लक्ष लागलं आहे.   

Updated: Apr 25, 2023, 12:07 PM IST
WTC साठी भारतीय संघाची घोषणा; अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी title=
IPL 2023 ajinkya got selected in team india for World Test Championship 2023 see whole team

WTC Team India : आयपीएलमध्ये विरोधी संघाच्या गोलंदाजांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या कामगिरीची अखेर दखल घेण्यात आली आहे. आगामी World Test Championship च्या अंतिम सामन्यासाठी नुकतंच बीसीसीआयकडून संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात अजिंक्य रहाणेचाही (Ajinkya Rahane) समावेश असून, त्यानं संघात दणक्यात कमबॅक केल्याच्या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. 

भारतीय क्रिकेट संघापासून बराच काळ दूर असणाऱ्या रहाणेच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आयपीएलच्या (IPL 2023) संधीचं त्यानं सोनं केलं. ज्या बळावर आणि अर्थातच भारतीय क्रिकेट संघातून इंग्लंडमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव असल्यामुळं त्याला आगामी WTC साठीसुद्धा निवडण्यात आलं आहे. आता त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. जेव्हा जेव्हा अजिंक्यवर संघ आणि निवड समितीनं विश्वास ठेवला तेव्हातेव्हा त्यानं तो सार्थ ठरवत लक्षवेधी कामगिरी केली आहे. त्यामुळं आताही संघासाठी प्रभावी खेळाचं प्रदर्शन करण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर असेल. 

हेसुद्धा वाचा : Mumbai Indians आज तरी जिंकणार? हार्दिक पांड्याचं रोहित शर्माला आव्हान, पाहा संभाव्य Playing 11

 

अजिंक्य भारतीय संघासाठी अखेरचा कसोटी सामना जानेवारी 2022 मध्ये खेळला होता. या सामन्यात संघ दक्षिण आफ्रिकेविरोधात मैदानात उतरला होता. त्यावेळी काहीशा निराशाजनक खेळीमुळं त्याला संघाचं उपकर्णधारपदही गमवावं लागलं होतं. 

भारतीय संघात कोणाला मिळाली संधी? 

BCCI नं ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी भारतीय संघात रोहित शर्माकडे संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी असेल. संघातील खेळाडू खालीलप्रमाणे.. 

रोहित शर्मा 

शुभमन गिल

चेतेश्वर पुजारा 

विराट कोहली 

अजिंक्य रहाणे 

केएल राहुल 

केएस भरत 

रविचंद्रन अश्विन 

रविंद्र जडेजा 

अक्सर पटेल 

शार्दुल ठाकूर 

मोहम्मद शमी 

मोहम्मद सिराज 

उमेश यादव 

जयदेव उनाडकट

 

कधी आहे हा सामना? 

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांदरम्यान हा सामना 7 जून 2023 रोजी खेळवला जाणार आहे. यामध्ये Team India नं घरच्याच मैदानावर पराभूत करत ICC WTC मध्ये धडक मारली होती. आता हा संघ अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.