IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या आधी गुजरात टाइटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) बंगळुरुला पोहोचला आहे. नॅशनल क्रिकेट अकॅडमी (NCA) येथे त्याला आपली फिटनेस टेस्ट पास करायची आहे. BCCI च्या करारानुसार, खेळाडूंना एनसीएमध्ये ही टेस्ट पास करणं अनिवार्य आहे. तरच ते आयपीएलमध्ये भाग घेऊ शकणार आहेत. असं देखील कळतं आहे की, एनसीएकडून हार्दिक पंड्या (Hardik Pandya) समोर अनेक अटी ठेवण्यात आल्या आहेत. जर या परीक्षेत तो पास झाला तरच त्याला आयपीएलमध्ये खेळायला मिळणार आहे. (Hardik Pandya to play in IPL 2022 until or unless he clears his fitness test.)
इनसाइड स्पोर्टच्या बातमीनुसार, एनसीए हेड व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) आणि फिजियोकडून फिटनेस टेस्टचा (Fitnest test) संपूर्ण आराखडा तयार केला जातो. हार्दिक पंड्याला 10 ओव्हर टाकाव्या लागणार आहेत. सोबत त्याला यो-यो टेस्ट (Yo-Yo Test) देखील पास करावी लागणार आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या मते, बीसीसीआयच्या वार्षिक करारानुसार प्रत्येक खेळाडूला फिटनेस टेस्ट पास करणं अनिवार्य आहे.
टी-20 वर्ल्डकपनंतर क्रिकेटपासून दूर
टी-20 वर्ल्डकप 2021 पासून हार्दिक पंड्या (Hardik Pandya) क्रिकेटपासून दूर आहे. वर्ल्डकप आणि त्याच्या आधी आयपीएलमध्ये देखील तो जास्त वेळ बॉलिंग करु शकला नव्हता. हार्दिक पंड्या IPL 2022 मध्ये बॉलिंग करणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
आयपीएल 2022 सुरु होण्याआधी शिखर धवन, सूर्यकुमार यादव सह अनेक खेळाडू एनसीएमध्ये उपस्थित होते. फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर खेळाडूंना आपल्या संघात सहभागी होता येणार आहे.
हार्दिक पंड्या याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. पण IPL 2022 च्य़ा सीजनमध्ये तो गुजरात टायटन्स (Gujarat Titans captain) कडून खेळणार असून तोच संघाचा कर्णधार असणार आहे.