मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आता प्लेऑफच्या दिशने प्रवास सुरु झाला आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) दृष्टीने निवड समितीची आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंकडे लक्ष असणार आहे. या टी 20 वर्ल्ड कपसाठी यंदा टीम इंडियात अपवाद वगळता अनेक नवे चेहरे पाहायला मिळू शकतात. या वर्ल्ड कपमध्ये कदाचित केएल राहुल कॅप्टन रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसणार नाही. (ipl 2022 team india captain rohit sharma might not to open with k l rahul in upcoming t 20 world cup)
रोहित शर्मा आणि माजी कॅप्टन विराट कोहली आयपीएलच्या सध्याच्या मोसमात अपयशी ठरलेत. पण हे दोघे टी 20 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करतील, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.
त्याचवेळी, दीर्घकाळ ओपनिंग करणारा केएल राहुल पुन्हा मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसू शकतो. कारण अनुभवी फलंदाज शिखर धवन जबरदस्त कामगिरी करतोय. धवनने ओपनिंग केल्यास राईट-लेफ्ट कॉम्बीनेशन जोडी मिळेल.
आयपीएलच्या 15 व्या हंगामात विराट आणि रोहितला विशेष अशी कामगिरी करता आलेली नाही. हे दोघे अपयशी ठरत असल्याने टीम इंडियाची आणि निवड समितीची डोकेदुखी वाढली आहे.
रोहितने आयपीएलच्या या मोसमातील 9 सामन्यांमध्ये 155 तर विराटने 10 मॅचमध्ये 186 धावा केल्या आहेत. या दोघांना आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल चांगला फॉर्ममध्ये आहे. पण त्याने सावधपणे डावाची सुरुवात केली. केएल पॉवरप्लेमध्ये फटकेबाजी करण्याकडे त्याने टाळल्याचं दिसून आलं.