टीम इंडियात या तडाखेबाज फलंदाजाला संधी मिळणार?

कोणत्याही संघासाठी सलामीची जोडी खूप महत्त्वाची असते. ओपनर जोडीची चांगली फलंदाजी हीच संघाच्या विजयाची हमी असते.

Updated: May 6, 2022, 06:37 PM IST
टीम इंडियात या तडाखेबाज फलंदाजाला संधी मिळणार?  title=

मुंबई : कोणत्याही संघासाठी सलामीची जोडी खूप महत्त्वाची असते. ओपनर जोडीची चांगली फलंदाजी हीच संघाच्या विजयाची हमी असते. IPL 2022 मध्ये एक स्फोटक सलामीवीर धमाकेदार बॅटिंग करतोय. अशा परिस्थितीत निवड समिती या खेळाडूला टीम इंडियामध्ये संधी देऊ शकतात. (ipl 2022 srh abhishek sharma may be chance in team india)

या खेळाडूला संधी मिळणार? 

सनरायजर्स हैदराबादसाठी ओपनर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) दमदार कामगिरी केली आहे. अभिषेकने हैदराबादला अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले आहेत. अभिषेकने या मोसमातील 9 सामन्यात 331 धावा केल्या आहेत. आयपीएलनंतर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. अभिषेकला या मालिकेत संधी मिळू शकते.

हैदराबादने अभिषेकसाठी 6.5 कोटी मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. अभिषेकला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी गुजरात आणि पंजाबमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली होती. मात्र अखेर हैदराबाद वरचढ ठरली. अभिषेकने अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये बॅटिंग आणि बॉलिंग अशा दोन्ही आघाड्यांवर शानदार कामगिरी केली होती.

रोहितसारखी आक्रमक बॅटिंग 

अभिषेक रोहित शर्माप्रमाणे आक्रमक आणि तुफानी बॅटिंग करतो. अभिषेकचं शॉर्ट सिलक्शन शानदार आहे. अभिषेक सेट होण्यासाठी काही वेळ घेतो. त्यानंतर तो आपला तडाखा दाखवतो.