मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहावा सामना आज डी वाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. बंगळुरू विरुद्ध कोलकाता सामना होणार आहे. कोलकाता टीमने चेन्नईला धूळ चारली होती. आता पुन्हा एकदा बंगळुरू टीमचा धोबीपछाड करण्यासाठी सज्ज आहे.
श्रेयस अय्यरने पहिला चेन्नई विरुद्धचा सामना जिंकला. आता बंगळुरू विरुद्ध सामना जिंकण्यासाठी काय मास्टरप्लॅन आखणार याकडे लक्ष आहे. तर बंगळुरूचा हा दुसरा सामना असणार आहे. पहिला सामना पंजाबसोबत झाला असून त्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला.
काय सांगतात हेड टू हेड रेकॉर्ड
बंगळुरू विरुद्ध कोलकाता दोन्ही टीम एकमेकांविरुद्ध आतापर्यंत 30 सामने खेळल्या आहेत. 17 सामन्यांमध्ये कोलकाता टीमने विजय मिळवला आहे. तर 13 सामन्यांमध्ये बंगळुरू टीमला विजय मिळवण्यात यश आलं.
विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, गौतम गंभीर मॅक्युलमने सर्वात जास्त धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं 774 धावा केल्याचा विक्रम आहे. तर सुनील नरेनने सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत. आजच्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
कोलकाता संभाव्य प्लेइंग इलेव्हन
अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शेल्डन जॅक्सन, टिम साउदी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती
बंगळुरू संभाव्य प्लेइंग इलेवन
फाफ डुप्लेसीस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक, शेरफाने रुदरफोर्ड, शाहबाज अहमद, डेव्हिड विली, वानेंदु हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि सिद्धार्थ कौल