IPL 2022 संपल्यावर विराट कोहली क्रिकेटमधून ब्रेक घेणार?

खराब फॉर्ममुळे क्रिकेटमधून ब्रेक घेण्यावर पहिल्यांदाच बोलला विराट कोहली; म्हणाला, 'माझं स्वप्न....'

Updated: May 20, 2022, 08:02 AM IST
IPL 2022 संपल्यावर विराट कोहली क्रिकेटमधून ब्रेक घेणार? title=

मुंबई : कोहली गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्ममध्ये खेळत होता. त्याने कर्णधारपद सोडल्यानंतरही त्याला पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी प्रयत्न करूनही यश मिळत नव्हतं. जे गेल्या 13 मॅचमध्ये कोहलीला जमलं नाही ते त्याने एका मॅचमध्ये करून दाखवलं. 

विराट कोहलीने बंगळुरूला गुजरात विरुद्ध सामन्यात जिंकवून देण्यात मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळे कोहली पुन्हा फॉर्ममध्ये आल्याने चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला.

विराट कोहलीने बंगळुरूला विजय मिळवून दिला आहे. बंगळुरूच्या प्लेऑफच्या आशा अजूनही कायम आहेत. दिल्ली आणि पंजाब टीमच्या कामगिरीवर लक्ष आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कोहली खराब फॉर्ममध्ये खेळत असल्याने त्याने ब्रेक घ्यावा अशी मागणी दिग्गज करत आहेत. यावर पहिल्यांदाच विराट कोहलीने मौन सोडलं आहे. कोहलीनं क्रिकेटमधून ब्रेक घेण्याबाबत पहिल्यांदाच वक्तव्य केलं. 

मला याची कल्पना आहे की जेव्हा माझा स्कोअर चांगला येईल तेव्हा मला मोटिवेट करतील. भारताने टी 20 वर्ल्ड कप जिंकावा असं मला वाटतं. मला संतुलन राखून थोडासा आराम करायचा आहे. 

माझा मुख्य उद्देश टी 20 वर्ल्ड कप जिंकणं आहे. त्यामुळे मी टीमसाठी काहीही करू शकतो. मला टी 20 वर्ल्ड कप जिंकवून द्यायचं आहे. मला एकदमच क्रिकेटमधून ब्रेक घ्यायचा नाही. दोन्हीचं बॅलन्स करायचं आहे. आता विराट कोहली एका सीरिजपुरता आराम करणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.