Ravindra Jadeja पाठोपाठ आणखी एक खेळाडू सोडणार कर्णधारपद?

टीमचं नुकसान करून आता कर्णधारपद सोडणार? पाहा कोण तो खेळाडू?  

Updated: May 1, 2022, 11:59 AM IST
Ravindra Jadeja पाठोपाठ आणखी एक खेळाडू सोडणार कर्णधारपद? title=

मुंबई : जगातील सर्वात मोठी लीग आयपीएल आहे. यामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळते. देशासाठी खेळण्याचं भाग्य मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. या लीगकडे संपूर्ण जगाचं लक्ष असतं. अशा या लीगमध्ये चेन्नईचं नेतृत्व रवींद्र जडेजानं सोडलं आहे. 

धोनीनं चेन्नईच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर रविंद्र जडेजाकडे ती जबाबदारी देण्यात आली. मात्र जडेजानं आयपीएलच्या मध्येच कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्याने धोनीकडे पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. 

रविंद्र जडेजापाठोपाठ आता आणखी एका टीममध्ये खळबळ उडाली आहे. याचं कारण म्हणजे फ्लॉप शोमध्ये खेळणारा फलंदाज मयंक अग्रवालही कर्णधारपद सोडण्याच्या मार्गावर आहे. 

मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जचेही झाले आहे. मयंक आयपीएलच्या यंदाच्या मोसमातही प्रथमच कर्णधार आहे. पण मयंकला टीमचं नेतृत्व चांगलं करता येत नाही का असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. 

पंजाब पुन्हा एकदा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. पंजाबच्या संघाने 9 सामन्यांत केवळ 4 सामने जिंकले असून ते सध्या लीग टेबलमध्ये 7व्या स्थानावर आहेत.

आयपीएलचे मागचे काही रेकॉर्ड पाहता मयंक 3 सीरिज खूप चांगलं खेळला होता. आतापर्यंत तो 108 सामने खेळला आहे. त्याने 2292 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 1 शतक आणि 12 अर्धशतक केले आहेत. 

मयंक अग्रवालने या हंगामात आतापर्यंतच्या सामन्यात 161 धावा केल्या आहेत. मयंक लखनऊ विरुद्ध सामन्यात 25 धावा केल्या आणि तंबुत परतला. मयंकचा हा खराब फॉर्म पाहता त्याला टी 20 वर्ल्ड कपमध्ये संधी देणार की नाही याची शंका आहे.