IPL 2022, MI | सूर्यकुमार यादव पुढील सामन्यात खेळणार की नाही? झहीर खान म्हणाला.....

आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आपल्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

Updated: Apr 1, 2022, 09:53 PM IST
IPL 2022, MI | सूर्यकुमार यादव पुढील सामन्यात खेळणार की नाही? झहीर खान म्हणाला..... title=

मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आपल्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीने मुंबईला पराभूत केलं. या सामन्यात युवा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवला  (Suryakumar Yadav) दुखापतीमुळे खेळू शकला नाही. मात्र सूर्यकुमार आता दुखापतीतून सावरलाय. तसेच तो टीमसोबत जोडला गेला आहे. (ipl 2022 mi mumbai indians zaheer khan given updates for suryakumar yadav)

सूर्यकुमार आता पुढील सामन्यात खेळणार की नाही, असा प्रश्न प्रत्येक मुंबईच्या चाहत्याला पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर झहीर खानने दिलं आहे.

झहीर खान काय म्हणाला? 

"सूर्यकुमार राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या पुढील सामन्यासाठी निवडीसाठी उपलब्ध आहे. आम्ही सूर्यकुमारच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत", अशी माहिती झहीर खानने दिली. झहीरने पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. शनिवारी डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई विरुद्ध राजस्थान यांच्यात हा सामना खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध वेस्टइंडिज यांच्यात फेब्रुवारीत टी 20 मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत सूर्याला ही दुखापत झाली होती. त्यानंतर सूर्या बंगळुरुतील एनसीएमध्ये (NCA) दुखापतीतून सावरण्यासाठी गेला. दुखापतीतून सावरल्यानंतर सूर्या मुंबई टीमसह जोडला गेला. तसेच त्याने सराव सत्रातही सहभाग घेतला.