IPL 2022, KKR vs PBKS | कोलकाताच्या गोलंदाजांसमोर पंजाबचे किंग्स ढेर, विजयासाठी 138 धावांचे आव्हान

कोलकाताच्या (KKR) गोलंदाजांसमोर पंजाबचे किंग्स (PBKS) ढेर झाले आहेत. पंजाबला कोलकाताच्या बॉलर्ससमोर 20 ओव्हरही खेळता आलं नाही. 

Updated: Apr 1, 2022, 09:33 PM IST
IPL 2022, KKR vs PBKS | कोलकाताच्या गोलंदाजांसमोर पंजाबचे किंग्स ढेर, विजयासाठी 138 धावांचे आव्हान title=

मुंबई : कोलकाताच्या (KKR) गोलंदाजांसमोर पंजाबचे किंग्स (PBKS) ढेर झाले आहेत. पंजाबला कोलकाताच्या बॉलर्ससमोर 20 ओव्हरही खेळता आलं नाही. पंजाबचा बाजार 18.2 ओव्हरमध्येच 137 धावांवर उठला. कोलकाताच्या भेदक माऱ्यासमोर पंजाब किंग्सला 138 धावांचंच आव्हान देता आलं. (ipl 2022 kkr vs pbks punjab kings set 138 runs target for winning to kolkata knight riders)

पंजाबकडून भानुका राजपक्षेने (Bhanuka Rajpaksa) सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. कगिसो रबाडाने 25 धावांचं योगदान दिलं.  लियाम लिविंगस्टोनने 19 रन्स केल्या. तर शिखर धवनने 16 आणि हरप्रीत ब्रारने 14 रन्स केल्या.

कोलकाताकडून उमेश यादवने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. टीम साऊथीने 2 विकेट्स घेतल्या. तर सुनीर नरेन, आंद्रे रसेल आणि शिवम मावीने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

केकेआर प्लेइंग इलेव्हन | श्रेयस अय्यर (कॅप्टन), अजिंक्य रहाणे,  वेंकटेश अय्यर, नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नारायण, टीम साऊथी, उमेश यादव, शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती. 

पंजाबची प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, लियाम लिविंगस्टन, भानुका राजपक्षे (विकेटकीपर), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, राज बावा, अर्शदीप सिंह, हरप्रीत बराड, कगिसो रबाडा आणि राहुल चाहर.