IPL : पुढच्या सिझनमध्ये श्रेयस अय्यरला 'या' 3 संघाची मिळू शकते कॅप्टनशिप

या कारणामुळे दिल्लीचं कर्णधार पद सोडणार श्रेयस 

Updated: Nov 2, 2021, 09:15 AM IST
IPL : पुढच्या सिझनमध्ये श्रेयस अय्यरला 'या' 3 संघाची मिळू शकते कॅप्टनशिप  title=

मुंबई : पुढील वर्षी आयपीएलमध्ये मेगा लिलाव (Mega Aiuction)होणार आहे. त्यानंतर सर्व संघ पूर्णपणे बदलतील आणि प्रत्येक संघात अनेक नवीन खेळाडू दिसतील. यादरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार आणि फलंदाज श्रेयस अय्यर कोणत्या संघात आहे? याकडे प्रत्येक क्रिकेट चाहत्याचे लक्ष असेल. त्याचवेळी, अनेक संघ आहेत जे त्याला त्यांचा नवा कर्णधार बनवू शकतात. ते संघ कोणते आहेत ते पाहूया. 

अय्यर बनू शकतो या संघाचा कर्णधार 

दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर म्हटले की, पुढील हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघ सोडून लिलावात आपले नाव देईल. बऱ्याच काळानंतर अय्यरला आणखी एका नव्या टीममध्ये पाहता येणार आहे. विशेषत: अनेक संघांना त्याला आपला कर्णधार बनवायला आवडेल. या यादीत पहिले नाव RCBचे आहे. 

विराट कोहलीने हे पद सोडण्याचा निर्णय घेतल्याने आरसीबीला पुढील वर्षी नवीन कर्णधाराची गरज भासणार आहे. अय्यर हा या संघासाठी योग्य असेल कारण तो युवा खेळाडू आहे आणि त्याला आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा अनुभवही आहे.

आरसीबी व्यतिरिक्त लखनऊ आणि अहमदाबादचे संघही अय्यरचा समावेश करण्याचा प्रयत्न करतील. लखनऊ आणि अहमदाबाद आयपीएलच्या या मोसमात सामील झाले आहेत. या दोन्ही संघांना पुढील हंगामात दमदार कामगिरी करण्यासाठी काही चांगल्या खेळाडूंची आवश्यकता असेल आणि अय्यर त्यांच्या संघासाठी चांगला कर्णधार ठरू शकतो.

दिल्लीच्या यशाच कारण 

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला खूप यश मिळाले आहे. 2020 वगळता दिल्लीचा संघ कधीही आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला नाही. या संघाला अंतिम फेरीत नेणारा कर्णधार श्रेयस अय्यर होता. तथापि, 2021 च्या सुरुवातीला अय्यरला दुखापत झाली आणि त्याला दिल्लीच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले. अय्यरच्या कर्णधारपदाशिवाय दिल्ली आजपर्यंत कोणत्याही मोसमात अंतिम फेरीत पोहोचली नव्हती.

पंतला बनवलं नवं कॅप्टन 

दिल्ली कॅपिटल्सने 2021 च्या हंगामासाठी ऋषभ पंतची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी तो दुखापतीमुळे बाहेर पडला होता. 2021 च्या उत्तरार्धात अय्यर खेळायला आला तेव्हा त्याला कर्णधार बनवण्यात आले नाही, म्हणून त्याने दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला.