मुंबई: डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आयपीएलच्या मेगा लिलाव होणार आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक संघाला रिटेन आणि रिलिज केलेल्या खेळाडूंची नाव पाठवायची आहेत. विराट कोहलीनं RCB सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता RCB चा नवा कर्णधारपद कोणाच्या खांद्यावर द्यायचं याचा विचार केला जात आहे.
डेव्हिड वॉर्नर उत्तम फलंदाज आहे.IPL मध्ये जरी त्याची फलंदाजी चालली नसली तरी T20 फॉरमॅटमध्ये त्याच्या फलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला. त्यामुळे आता वॉर्नरसाठी लखनऊ, अहमदाबाद आणि RCB अशा तीन संघापैकी एकाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
RCB व्यवस्थापन डेव्हिड वॉर्नरचा विचार करू शकतं. टी-20 वर्ल्ड कपमध्ये वॉर्नरने तुफानी फॉर्म दाखवला. T20 वर्ल्ड कपच्या 7 सामन्यात 289 धावा केल्या. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वॉर्नरला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्कार देण्यात आला.
वॉर्नरकडे लांब सिक्स ठोकण्याचं कौशल्य आहे. त्यामुळे RCB संघ त्याचा विचार करू शकतं. आतापर्यंत एकदाची RCB आयपीएलची ट्रॉफी जिंकू शकलं नाही. त्यामुळे संघ बांधणीच्या दृष्टीनं कर्णधार निवडण्याचं मोठं आव्हान RCB समोर असणार आहे.
वॉर्नरने आयपीएलमध्ये 150 सामन्यांमध्ये 5449 धावा केल्या आहेत. वादळी फलंदाजी करण्यात वॉर्नर अत्यंत निष्णात खेळाडू आहे. त्यामुळे कोहली ऐवजी वॉर्नर हा एक चांगला पर्याय RCB समोर अशू शकतो असंही सांगितलं जात आहे.
दुसरा पर्याय हा शिखर धवन असणार आहे. दिल्ली संघ शिखर धवनला रिटेन करणार नाही अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिखर धवन हा विराट कोहलीच्या जागी कर्णधार म्हणून RCB समोर एक चांगला पर्याय आहे.
शिखर धवननं आयपीएलच्या 16 सामन्यात 587 धावा केल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात मात्र त्याचा फॉर्म तेवढा चांगला राहिला नाही. मात्र मोठा पल्ला खेळण्यात अपयशी ठरला. असं असलं तरीही गब्बर हा प्रबळ दावेदार ठरू शकतो. कारण त्याला लांबचा पल्ला गाठण्याचं कौशल्य आहे. शिवाय गब्बर उत्तम फलंदाज आहे. त्यामुळे त्याचा फायदा RCB घेऊ शकतं.