वडील सलूनचालक, मुलगा क्रिकेटर, जाणून घ्या कोण आहे राजस्थानचा 'कुलदीप'?

लखनऊला शेवटच्या 20 व्या ओव्हरमध्ये 15 धावांची गरज होती. कुलदीप सेनच्या (Kuldeep Sen) समोर आक्रमक मार्कस स्टोयनिस होता. पदार्पणातील सामन्यताच कुलदीपने 15 धावांचा बचाव केला.

Updated: Apr 11, 2022, 07:50 PM IST
वडील सलूनचालक, मुलगा क्रिकेटर, जाणून घ्या कोण आहे राजस्थानचा 'कुलदीप'? title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL) 20 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) लखनऊ सुपर जायंट्सवर (LSG) 3 धावांनी विजय मिळवला. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानचा चार सामन्यांमधला हा तिसरा विजय ठरला. राजस्थान टीम या विजयानंतर  पॉइंट्सटेबलमध्ये  पहिल्या क्रमांकावर पोहोचली. (ipl 2022 match 20 rr vs psg lucknow supergiants kuldeep sen delivered sensational 20th over know who is)

फास्टर बॉलर कुलदीप सेन राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. लखनऊला शेवटच्या 20 व्या ओव्हरमध्ये 15 धावांची गरज होती. कुलदीपच्या समोर आक्रमक मार्कस स्टोयनिस होता. पदार्पणातील सामन्यताच कुलदीपने 15 धावांचा बचाव केला. कुलदीपने या 20 व्या ओव्हरमधील पहिल्या 4 बॉलमध्ये कुलदीपने फक्त एक धाव दिली.

कुलदीपने 4 ओव्हरमध्ये 35 धावा देत 1 विकेट घेतली. त्याने दीपक हुड्डाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. दीपकने 24 बॉलमध्ये 3 चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या.  

राजस्थान फ्रँचायजीने कुलदीपला त्याच्या 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजमध्ये आपल्या गोटात घेतलं. कुलदीपचा जन्म मध्य प्रदेशमधीस रिवा जिल्ह्यातील हरिहरपूर इथला.  कुलदीपने टी 20 आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये राज्याचं प्रतिनिधित्व केलं. कुलदीपच्या वडिलांचं शहरात सलून आहे.

कुलदीपला लहानपणापासून क्रिकेटचं वेड होतं. कुलदीपने वयाच्या 8 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. कुलदीपच्या घरची स्थिती फार चांगली नव्हती. 

कुलदीपकडे एकेडमी जॉईन करण्यासाठीही पैसै नव्हते. मात्र कुलदीपला त्याचं क्रिकेटर होण्याचं स्वप्न साकार करता यावं, यासाठी त्या एकेडमीने कुलदीपची फी माफ केली. कुलदीपने 2018 मध्ये रणजी करंडक स्पर्धेतून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

“आम्ही कुलदीपला ज्युनिअर लेव्हलवर पाहिलंय. कुलदीपने आपल्या कामगिरीने निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटला प्रभावित केलं. परिणामी कुलदीपला सिनिअर टीममध्ये घेण्याचा निर्णय झाला. त्यासाठी त्याला तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला", अशी प्रतिक्रिया मध्य प्रदेशचा माजी कॅप्टन देवेंद्र बुंदेलाने दिली.  

आपल्या पदार्पणातील हंगामात कुलदीपने पंजाब विरुद्ध एका डावात 5 विकेट्स घेतल्या. कुलदीपने या मोसमात एकूण 25 विकेट्स घेतल्या. 

कुलदीपने आतापर्यंत एकूण 16 फर्स्ट क्लास सामन्यात 44 विकेट्स घेतल्या आहेत.  तर लिस्ट ए सामन्यात त्याने 4 विकेट्स घेतल्या आहेत.  तर 19 टी सामन्यात त्याने 13 फंलदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.