IPL 2022 : आपल्या संघात घेण्यासाठी मुंबईच्या या ऑलराऊंडवर असेल अनेकांचा डोळा

आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी, एक मेगा लिलाव होणार आहे, ज्यामध्ये संघ जगभरातील खेळाडूंवर करोडो रुपये खर्च करतील आणि त्यांना त्यांच्या संघात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतील.

Updated: Nov 6, 2021, 04:49 PM IST
IPL 2022 : आपल्या संघात घेण्यासाठी मुंबईच्या या ऑलराऊंडवर असेल अनेकांचा डोळा title=

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) सुरू होण्यापूर्वी, एक मेगा लिलाव होणार आहे, ज्यामध्ये संघ जगभरातील खेळाडूंवर करोडो रुपये खर्च करतील आणि त्यांना त्यांच्या संघात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतील. पुढील हंगामात सर्व संघ पूर्णपणे बदलणार आहेत. त्यामागील कारण म्हणजे पुढील वर्षीपासून आयपीएलमध्ये (IPL) 8 ऐवजी 10 संघ असतील आणि प्रत्येक जुना संघ लिलावापूर्वी फक्त 4 जुन्या खेळाडूंना कायम ठेवू शकेल. अशा परिस्थितीत सर्व चाहत्यांच्या नजरा नक्कीच महेंद्रसिंह धोनी (Dhoni) च्या CSK वर असतील.

पुढील वर्षी आयपीएल मेगा लिलाव (IPL Bidding) होणार असल्याने धोनीचा सीएसके कोणत्या खेळाडूंवर सट्टा लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषत: सीएसकेच्या नजरा त्यांच्यासोबत स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्यावर (Hardik pandya) असतील. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कडून दरवर्षी खेळणाऱ्या हार्दिकला पुढील वर्षी वगळले जाऊ शकते. अशा परिस्थितीत हार्दिकला त्यांच्यासोबत सामावून घ्यायला CSK ला नक्कीच आवडेल.

हार्दिक पांड्या हा देखील धोनीच्या खास खेळाडूंपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली हार्दिकने भारतीय संघात पदार्पण केले. तेव्हापासून हार्दिक धोनीच्या अगदी जवळच्या खेळाडूंपैकी एक आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 world cup 2021)  हार्दिकच्या निवडीत धोनीचा मोठा हात असल्याचंही सांगण्यात आलं होतं, अन्यथा दुखापतीतून पूर्ण बरा होण्यासाठी बीसीसीआय त्याला मायदेशी पाठवत होतं. असो, धोनीला त्याच्या खास खेळाडूंसोबत सीएसकेमध्ये खेळायला आवडेल.

हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्समध्ये कायम ठेवण्याची शक्यता नाही कारण रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, किरॉन पोलार्ड, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव कायम ठेवण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. पुढील वर्षी हार्दिकला वगळले जाऊ शकते, असेही सूत्रांकडून स्पष्ट झाले आहे. यामागचे एक मोठे कारण त्याचा गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला खराब फॉर्म आहे. अशा स्थितीत या स्टार खेळाडूला आपल्यासोबत सामावून घेण्यासाठी मोठे संघ आग्रही असतील.

हार्दिक पांड्याने आयपीएलच्या इतिहासात 92 सामने खेळले आहेत ज्यात त्याने 27.33 च्या सरासरीने आणि 153.91 च्या स्ट्राइक रेटने 1476 धावा केल्या आहेत. यादरम्यान हार्दिकने 4 अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 91 होती. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 31.26 च्या सरासरीने आणि 9.06 च्या इकॉनॉमी रेटने 42 विकेट घेतले आहेत.