K L Rahul | केएल राहुलचा धमाका, आयपीएलमध्ये सलग 5 वेळा पराक्रम

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 45 व्या सामन्यात लखनऊ सुपर जांयट्सचा (Lucknow Super Giants) कॅप्टन केएल राहुलने (K L Rahul) धमाका केला.

Updated: May 1, 2022, 09:16 PM IST
K L Rahul | केएल राहुलचा धमाका, आयपीएलमध्ये सलग 5 वेळा पराक्रम  title=

मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 45 व्या सामन्यात लखनऊ सुपर जांयट्सचा (Lucknow Super Giants) कॅप्टन केएल राहुलने (K L Rahul) धमाका केला.  केएलने दिल्ली विरुद्ध 51 बॉलमध्ये 77 धावांची खेळी केली. केएलने या खेळीत 5 सिक्स आणि 4 फोर लगावले. केएलने या खेळीसह आयपीएलच्या 15 व्या मोसमात 400 धावांचा टप्पा पूर्ण केला. यासह केएलने आयपीएलमध्ये मोठा पराक्रम केला आहे. (ipl 2022 lsg captain kl rahul scored 400 plus runs for the 5th time in a row since 2018)

केएलने आयपीएलमध्ये सलग 5 वेळा 400 पेक्षा अधिक धावा करण्याचा कारनामा केला आहे. केएलने 2018 पासून ते आतापर्यंत 400 पेक्षा अधिक धावा करण्याची परंपरा कायम राखली आहे. याशिवाय केएलने आयपीएलमध्ये 150 सिक्सही पूर्ण केले. राहुलच्या नावावर आता 104 सामन्यात 154 सिक्सची नोंद आहे. 

केएल राहुलच्या 2018 पासून धावा

2018 - 659 धावा
2019- 593 धावा
2020- 670 धावा
2021- 626 धावा
2022- 451* धावा

केएल या मोसमात धमाकेदार कामगिरी करतोय. केएलने सुरु हंगामाता आतापर्यंत 2 शतक लगावले आहेत. विशेष म्हणजे केएलने मुंबई विरुद्धच हा कारनामा केलाय. विशेष म्हणजे केएलने दोन्ही वेळेस नाबाद 103 धावांची खेळी केली.