IPL 2022 | आयपीएलमध्ये विराटसोबत नक्की काय झालेलं? गंभीरने सांगितलं कारण

 गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि आरसीबीचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात 2013 मध्ये भर मैदानात सामन्यादरम्यान वाद झाला होता.

Updated: Mar 19, 2022, 10:17 PM IST
IPL 2022 | आयपीएलमध्ये विराटसोबत नक्की काय झालेलं? गंभीरने सांगितलं कारण title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) श्रीगणेशा 26 मार्चपासून होतोय. या 15 व्या मोसमापासून लखनऊची नवी टीम पदार्पण करतेय. या लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) या टीमच्या मार्गदर्शक पदाची जबाबदारी ही गौतम गंभीरकडे (Gautam Gambhir)  आहे. गंभीरने कोलकाताला 2 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिली आहे.  गंभीर आणि आरसीबीचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात 2013 मध्ये भर मैदानात सामन्यादरम्यान वाद झाला होता. गंभीरने याच वादाची आठवण करून दिली. गंभीर आणि विराट यांच्यात रजत भाटीयाने मध्यस्थी केली होती. (ipl 2022 kkr and rcb former captain gautam gambhir and virat kohli controversy)

गंभीर काय म्हणाला? 

"आमच्या दोघांमध्ये वैयक्तिक पातळीवर कोणताही वाद झाला नव्हता. असं अनेकदा घडतं. मला ती स्पर्धा आवडते, मला स्पर्धात्मक लोक आवडतात. एमएस धोनी आपल्या पद्धतीने प्रतिस्पर्धी खेळाडू आहे, विराट त्याच्या पद्धतीने प्रतिस्पर्धी आहे. कधीकधी जेव्हा तुम्ही संघाचे नेतृत्व करत असता तेव्हा तुम्हाला तसं करावं लागतं", असं गंभीर म्हणाला. 
 
"आमच्यात वैयक्तिक असं घडलं नव्हतं आणि कधी होणारही नाही. कर्णधार म्हणून कधी कधी तुम्ही वैयक्तिक संबंधांचा विचार करत नाही, फक्त तुम्ही संघाचे कर्णधार असता म्हणून करावं लागतं", असंही गंभीरने नमूद केलं. 
 
या सामन्यात आरसीबीने केकेआरवर 8 विकेट्सने विजय मिळवला होता. विराटने या सामन्यात 27 चेंडूत 35 धावा केल्या.  विराट कोहलीच्या विकेटनंतर दोन्ही कर्णधारांमध्ये वाद झाला. यानंतर रजत भाटियाने दोघांमध्ये मध्यस्थी केली आणि दोघांना एकमेकांपासून दूर नेलं.