'पलटण'चा सलग सहावा पराभव, अर्जुनला संधी मिळणार का?

नेटीझन्सचं मास्टर ब्लास्टर तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) संधी द्यावी असं म्हणंन आहे.  

Updated: Apr 16, 2022, 11:08 PM IST
'पलटण'चा सलग सहावा पराभव, अर्जुनला संधी मिळणार का? title=

मुंबई : लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Ginats) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 18 धावांनी मात केली. मुंबईचा या मोसमातील हा सलग 6 वा पराभव ठरला. या पराभवामुळे मुंबईच्या प्लेऑफच्या आशाही संपल्या. लखनऊ विरुद्धच्या सामन्यात मुंबईने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर निराशाजनक कामगिरी केली. फलंदाजी नसलेलं सातत्य, मेगा ऑक्शनमध्ये सोल्ड केलेले खेळाडू याचा मुंबईला जबर फटका बसला आहे. त्यामुळे आता नेटीझन्सचं मास्टर ब्लास्टर तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) संधी द्यावी असं म्हणंन आहे. ( ipl 2022 give debut chance to arjun tendulkar netizens demanded after mumbai indians consecutive 6 matchs lost)

अर्जुन अजूनही पदार्पणाच्या प्रतिक्षेत 

अर्जुनला गेल्या आणि या मोसमातही मुंबईच्या गोटात आहे. मुंबईने त्याला गेल्या हंगामात 20 तर यावेळेस 30 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. मात्र त्याला अजून डेब्यूची संधी दिलेली नाही. 

लखनऊ विरुद्धच्या सामन्यात अर्जुन आणि सचिन हे दोघेही डगआऊटमध्ये एकत्र बसलेले दिसून आले. या दोघांचा डगआऊटमधील फोटो व्हायरलही झालाय. 'मला संधी केव्हा मिळणार', असेच काहीसे हावभाव अर्जूनच्या चेहऱ्यावर होते. त्यामुळे आता पुढील सामन्यात अर्जुनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. 

"अर्जुनला संधी द्यायला हवी"

"युवा खेळाडूंना संधी द्यायला हवी. अर्जुनलाही संधी देऊ शकता. तो सध्या चांगल्या फॉर्मात आहे. होऊ शकतं की मैदानात तेंडुलकर आडनाव टीमचं भाग्य बदलेल", असं टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन म्हणाले.