मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या (IPL 2022) थराराला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी सर्व संघांनी जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. आपल्या पहिल्या आयपीएल टायटलच्या (Maiden Ipl Title) शोधात असलेल्या दिल्ली कॅपिट्ल्सला (Delhi Capitals) मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या अडचणीत वाढ झाली आहे. तब्बल 3 वेळा ऑरेन्ज कॅप विनर (IPL Orange Cap Winner) फलंदाजाला या मोसमाच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकावं लागणार आहे. (ipl 2022 delhi capitals david warner may missd starting 4 to 5 matchs of 15th season due to shane warne funeral)
कॅप्टन रिषभ पंतच्या डोकेदुखीत वाढ
आयपीएलचा मेगा ऑक्शन नुकताच पार पडला. यामध्ये दिल्ली कॅपिट्ल्सने हैदराबादचा माजी कर्णधार (SRH Captain) असलेल्या डेव्हिड वॉर्नरला (David Warner) आपल्या ताफ्यात घेतलं. वॉर्नरने आयपीएलच्या इतिहासात 3 वेळा ऑरेन्ज कॅप जिंकण्याची कामगिरी केली आहे. एका मोसमात सर्वाधिक करणाऱ्या फलंदाजाला ऑरेन्ज कॅपचा बहुमान दिला जातो.
वॉर्नर आपल्या गोटात आल्याने दिल्लीत आनंदाचं वातावरण होतं. मात्र तो आनंद फार वेळ टिकू शकला नाही. वॉर्नर 15 व्या मोसमातील पहिल्या काही सामन्यांसाठी उपलब्ध नसणार आहे. यामुळे कॅप्टन रिषभ पंतसह टीम मॅनेजमेंटच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नक्की कारण काय?
वॉर्नरसध्या ऑस्ट्रेलिया टीमसह पाकिस्तान दौऱ्यावर (Australia Tour of Pakistan) आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा 21-25 मार्च दरम्यान खेळवण्यात येणार आहे. यानंतर वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि स्पिनर शेन वॉर्नच्या (Shane Warne Funeral) शोकसभेला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे वॉर्नरला पहिल्या काही सामन्यांना मुकावं लागणार आहे.
वॉर्नरची आयपीएल कारकिर्द
वॉर्नरने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 150 सामने खेळला आहे. वॉर्नरने यामध्ये 139.97 स्ट्राईक रेट आणि 41.6 च्या एव्हरेजने 5 हजार 449 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 4 शतकं आणि 50 अर्धशतकं झळकावली आहेत. विशेष म्हणजे वॉर्नरने 14 मोसमांमध्ये 3 वेळा ऑरेन्ज कॅपचा बहुमान मिळवला आहे.