CSK vs MI | मुंबईच्या बॉलिंगसमोर चेन्नईचं लोटांगणं, पलटणला 98 रन्सचं टार्गेट

IPL 2022, CSK vs MI | मुंबईच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर   चेन्नई 16 ओव्हरमध्ये 97 धावांवर ऑलआऊट झाली आहे.

Updated: May 12, 2022, 09:15 PM IST
CSK vs MI | मुंबईच्या बॉलिंगसमोर चेन्नईचं लोटांगणं, पलटणला 98 रन्सचं टार्गेट  title=

मुंबई : चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली आहे. मुंबईच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर   चेन्नई 16 ओव्हरमध्ये 97 धावांवर ऑलआऊट झाली आहे. त्यामुळे मुंबईला विजयासाठी 98 धावांचं माफक आव्हान मिळालं आहे. (ipl 2022 csk vs mi chennai super kings 98 runs target against to mumbai indians mahednra singh dhoni devon conway)

चेन्नईकडून कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. धोनीने केलेल्या या खेळीमुळे चेन्नईला 90 पार मजल मारता आली.  मात्र धोनी व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आलं नाही. 

मुंबईकडून डॅनियल सॅम्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कुमार कार्तिकेय आणि रिले मेरिडथ या जोडीने प्रत्येकी 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर रमनदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी एक एक विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रमनदीप सिंह, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेविड, डेनियल सॅम्स, ऋतिक शौकीन, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ आणि कुमार कार्तिकेय. 

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), मोईन अली, ड्वेन ब्रावो, मुकेश चौधरी, महेश थीक्षाना आणि  सिमरजीत सिंह.