IPL 2022, CSK | धोनीसाठी गूड न्यूज, चेन्नईच्या टीममध्ये या घातक ओपनरची एन्ट्री

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरुवात होत आहे.सर्व संघांनी या स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी संघांपैकी एक आहे.   

Updated: Mar 22, 2022, 07:29 PM IST
IPL 2022, CSK | धोनीसाठी गूड न्यूज, चेन्नईच्या टीममध्ये या घातक ओपनरची एन्ट्री title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरुवात होत आहे.सर्व संघांनी या स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी संघांपैकी एक आहे. चेन्नईने गेल्या मोसमात आयपीएल ट्रॉफी पटकावली होती. यामध्ये चेन्नईचा ओपनर फॅफ डु प्लेसिसचं मोठं योगदान होतं. आता चेन्नईला डुप्लेसिसच्या बदल्यात तोडीसतोड खेळाडू भेटला आहे, जो बॉलर्सना धु धु धुवतो. (ipl 2022 csk chennai super kings devon conway may opening with ruturaj gaikwad)

 कोण आहे तो प्लेअर?

चेन्नईला 2021 मध्ये  चॅम्पियन बनवण्यात ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिस  या ओपनिंग जोडीचा मोठा वाट होता. या दोघांनी निर्णायक भूमिका बजावली होती. मात्र या मोसमात चेन्नईने फॅफच्या जागी न्यूझीलंडचा आक्रमक आणि तितकीच वादळी खेळी करणाऱ्या डेवॉन कॉनवेचा (Devon Conway) टीममध्ये समावेश केला आहे.

ऋतुराजसोबत करणार ओपनिंग

डेव्हॉन कॉनवे या मोसमात ऋतुराजसोबत ओपनिंग करणार आहे. ऋतुराजने गेल्या मोसमात धमाकेदार कामगिरी करत ऑरेन्ज कॅप मिळवली. एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेन्ज कॅप दिली जाते.  तसेच आता कॉनवे ऋतुराजसोबत ओपनिंग करु शकतो.