IPL 2021: कोहलीनं दाखवला बाहेरचा रस्ता पण 'या' संघानं सावरलं

विराट कोहलीच्या संघात 2 वर्ष खेळला मात्र यंदा स्थान मिळालं नाही, पण या संघानं पुन्हा एकदा संधी दिली

Updated: Apr 4, 2021, 12:14 PM IST
IPL 2021: कोहलीनं दाखवला बाहेरचा रस्ता पण 'या' संघानं सावरलं title=

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग आयपीएलला 9 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. 14 व्या हंगामावर कोरोनाचं सावट अधिक गडद होताना दिसत आहे. याच दरम्यान कोहलीनं ज्या खेळाडूला संघातून बाहेर काढलं तोच खेळाडू पुन्हा एकदा मैदानात बदला घेण्यासाठी येणार आहे. 

या खेळाडूला स्वत:ला सिद्ध करण्याची आणि पुन्हा एकदा विराट कोहलीला दाखवून देण्याची संधी मिळाली आहे. कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या संघात एका खेळाडूला समाविष्ट करून घेतलं आहे. हा खेळाडू यापूर्वी RCB संघातून खेळला होता. 

उत्तर प्रदेशचा लेफ्ट हॅण्ड फलंदाज रिंकू सिंह IPLआधी जखमी झाल्यानं KKR संघासमोर मोठा प्रश्न उभा होता. रिंकू सिंहच्या जागी कोणाला संधी द्यावी यावर विचार सुरू असतानाच गुरकीरत सिंह मानच्य़ा नाव निश्चित झालं. या खेळाडूला KKR संघानं सावरलं आणि रिंकू सिंहच्या जागी खेळण्याची IPLसाठी संधी दिली.

 गुरकीरत सिंह मानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2016रोजी डेब्यू केलं होतं. 2019 आणि 2020 या दोन वर्षांमध्ये विराट कोहलीच्या RCB संघाकडून त्याने IPLमध्ये भाग घेतला होता. 2019मध्ये केवळ तीन सामने खेळण्याची संधी गुरकीरतला मिळाली. 

2020मध्ये IPLमधील त्याची कामगिरी विशेष न राहिल्यामुळे विराट कोहली आणि RCB फ्रान्चायझीने त्याला रिलीज केलं. तर IPLच्या लिलावातही त्याला कोणी घेण्यासाठी तयार नव्हतं. मात्र आता रिंकू सिंह जेव्हा जखमी झाला तेव्हा त्याच्या नावावर एकमत झालं आणि अखेर KKR संघ तारणहार ठरला. 

कोलकाला नाइट रायडर्सचा पहिला सामना 11 एप्रिलला होणार आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध हा सामना होणार असून गुरकीरतला स्वत:ला पुन्हा सिद्ध करण्याची KKRकडून संधी मिळाली आहे.