IPL 2021 | 37 चेंडूत शतक ठोकणाऱ्या या आक्रमक फलंदाजाला विराट कोहली संधी का देत नाहीये?

या फलंदाजाने 37 चेंडूत शतक ठोकण्याचा कारनामा केलाय.    

Updated: Oct 5, 2021, 08:24 PM IST
IPL 2021 | 37 चेंडूत शतक ठोकणाऱ्या या आक्रमक फलंदाजाला विराट कोहली संधी का देत नाहीये? title=

मुंबई : आरसीबी (RCB) आयपीएलमध्ये (IPL) गेल्या काही हंगामात सातत्याने अपयशी ठरतेय. मात्र या आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL 2021) बंगळुरुने धमाकेदार कामगिरी करत प्लेऑफमध्ये (Playoff) धडक मारली. विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या नेतृत्वात टीमला इथवर पोहचवलं. मात्र बंगळुरुच्या इथवरच्या या यशस्वी प्रवासात एका आक्रमक फलंदाजाला स्थान मिळालं नाही. मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammed Azharuddeen) असं या आक्रमक फलंदाजाचं नाव आहे. (IPL 2021 Rcb Captain virat kohli is not take chance to Mohammed Azharuddeen who socre century only 37 ball in syed mushtaq ali trophy 2021)

अजहर अजूनही आयपीएल पदार्पणाच्या प्रतिक्षेत 

विकेटकीपर बॅट्समन असलेल्या अजहरुद्दीन हा अजूनही पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहे. बंगळुरुने या मोसमात अजहरुद्दीनला 20 लाख रुपये मोजून (IPL 2021 Auction) आपल्या ताफ्यात घेतलं. मात्र त्याला अजूनही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून हैराणी व्यक्त केली जात आहे. 

या 2 खेळाडूंमुळे अजहरला संधी नाही?

आयपीएलच्या 14 व्या मोसमात युवा खेळाडूंनी बॅटिंग आणि बोलिंगने आपली छाप सोडली. आरसीबीकडे आधीपासूनच मिस्टर 360 अर्थात एबी डी व्हीलियर्ससारखा आक्रमक फलंदाज आहे. एबी बॅटिंगसह विकेटकीपींगही करतो. त्यामुळे एबीला ड्रॉप करुन अजहरुद्दीन संधी देता येणार नाही. तर दुसऱ्या बाजूला विराटने राखीव विकेटकीपर म्हणून केएस भरतला 5 सामन्यांमध्ये संधी दिली. केएसनेही या संधीचा चांगला फायदा उचलला. त्यामुळे अजहरुद्दीनला अजूनही पदार्पणाची संधी मिळाली नाही.

37 चेंडूत धमाकेदार शतक 

अजहरुद्दीनने सय्यद मुश्ताक अली टी 20 करंडकात मुंबई विरुद्ध 37 चेंडूत शानदार शतक ठोकलं होतं. त्याने या सामन्यात एकूण 54 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 11 सिक्सच्या मदतीने  137 धावांची वादळी खेळी केली होती.

दुसऱ्या टप्प्याआधी धमाका

बंगळुरुने आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्याआधी सराव म्हणून इंट्रा स्क्वाड सामना खेळवण्यात आला. या सामन्यात अजहरुद्दीनने 43 बॉलमध्ये 4 चौकार आणि 3 सिक्ससह 66 धावांची खेळी केली. या अफलातून खेळीचा अजहरुद्दीनला अद्यापही फायदा झालेला नाही.

बंगळुरुने या मोसमात प्लेऑफमधील स्थान निश्चित केलेलं आहे. त्यामुळे साखळी फेरीतील उर्वरित 2 सामन्यांमध्ये तरी अजहरुद्दीनला पदार्पणाची संधी मिळणार का, याकडे सर्वांच लक्ष असणार आहे.