मुंबई: 9 एप्रिलपासून IPLसुरू होत आहे. IPLहा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे जगभरातून खेळाडू येत असतात. इतकच नाही तर अनेक युवा खेळाडूंना संधी मिळत असते. याच सामन्यासाठी एका युवा खेळाडूला संधी मिळाली आहे. पिच तयार करण्यासाठी मजुरी करणाऱ्या या खेळाडूचा IPLपर्यंत पोहोचण्याचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्याच्या या संघर्षाची जिद्दीचं रहस्य आणि त्याचा प्रवास जाणून घेऊया.
20 वर्षांचा लेग स्पिनर रवी बिश्नोई याने ट्रेनिंगसाठी पिजवर मजुरी करण्यापासून ते IPLमध्ये सिलेक्ट होण्यापर्यंतचा केलेला प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. त्याने मागच्या वर्षी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्य़ा गोलंदाजांच्या यादीमध्ये रवी बिश्नोईचं नाव घेण्यात आलं. त्याच्या गोलंदाजीची चर्चा इतकी झाली की यंदाच्या IPL स्पर्धेत पंजाब किंग्सने 2 कोटी रुपये देऊन संघात समाविष्ट करून घेतलं आहे.
एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान लेग स्पिनर रवी बिश्नोईने त्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे. रवीच्या कुटुंबियांमधील कोणीच क्रिकेटमध्ये नव्हते. या क्षेत्रात पाऊल ठेवणारा तोच पहिला खेळाडू होता. कोणत्या क्लबमध्ये जाऊन ट्रेनिंग घेण्याइतके पैसेही त्याच्याकडे नव्हते. घरची परिस्थिती खूप बिकट होती. मात्र त्याची जिद्द खूप मोठी होती. याच जिद्दीच्या जोरावर यंदा हा खेळाडू IPLमध्ये पंजाब किंग्स संघाकडून खेळताना दिसणार आहे.
आपल्या संघर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करुन देताना बिश्नोई म्हणाला की, अपयश हा आपल्या प्रगतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. संधी मिळते, तेव्हा ती वाया जाऊ द्यायची नाही. या संधीचं सोनं कसं करता येईल हे पाहायचं. प्रशिक्षक प्रद्योतसिंग राठौर आणि शाहरुख पठाण यांच्यासोबत जोधपूर येथे स्पार्टन नावाची क्रिकेट अकादमी सुरू केली. खिशात पैसे नसल्यानं मी आणि माझे सहकारी आम्ही सिमेंटच्या गोण्या उचलण्यापासून विटा लावण्यापर्यंत सगळी कामं केली.
मी बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळण्यासाठी IPLच्या सेलेक्शनला गेलो होते. त्यावेळी मला रिजेक्ट करण्यात आलं. पण मी माझे प्रयत्न सोडले नाहीत. यंदाच्य़ा IPLमध्ये पंजाब किंग्स संघाकडून बश्नोई खेळणार आहे. त्याने आपल्या संघाचा कर्णधार के एल राहुलचंही खूप कौतुक केलं आहे. राहुल मला कायमचं पाठींबा देतात. मनोबल वाढवता असंही बश्नोईने यावेळी सांगितलं.
मागच्या IPLमध्ये बिश्नोईनं 14 सामन्यांमध्ये 12 विकेट्स घेतल्या होत्या. यंदाच्या IPLमध्ये मला पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचं मी सोनं करेन असा विश्वास रवी बिश्नोईनं व्यक्त केला आहे.