IPL 2021: ऑयन मॉर्गन विरुद्ध सामना खेळण्यासाठी संजू सैमसनला नो टेन्शन

आयपीएलमध्ये आज म्हणजेच शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना होणार आहे.

Updated: Apr 24, 2021, 03:27 PM IST
IPL 2021: ऑयन मॉर्गन विरुद्ध सामना खेळण्यासाठी संजू सैमसनला नो टेन्शन title=

चेन्नई : आयपीएलमध्ये आज म्हणजेच शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना होणार आहे. म्हणजे ऑयन मॉर्गन (Eoin Morgan) समोर संजू सॅमसन (Sanju Samson) चे आव्हान असणार आहे. परंतु या सामन्यासाठी राजस्थानचा कर्णधार सॅमसनला कोणतेच टेन्शन किंवा प्रेशर नाही. त्यांना आज त्यांच्या विजयाची पर्वा नाही. त्यांनी टॅास जिंकला किंवा हरला तरी, ते हा सामना जिंकणार असल्याची त्यांना खात्री आहे. यामागील कारण म्हणजे आजचा सामना, जो मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

आज जेव्हा दोन्ही संघ मैदानावर उतरतील तेव्हा, त्यांच्यात या सीझनमधील हा पहिलाच आमना-सामना असणार आहे. हे दोन्ही संघ या सीझनमध्ये आपला 5 वा सामना खेळणार आहेत. यापूर्वी खेळल्या गेलेल्या 4 सामन्यात दोन्हीही संघ 3-3 ने पराभूत झाले आहेत. म्हणजेच, फक्त 1 सामना दोन्ही संघाने जिंकला आहे. पॉईंट्स टेबलवर राजस्थान सर्वात शेवटी आहे. तर कोलकाता त्याच्या वरच्या क्रमांकावर म्हणजेच 7व्या स्थानी आहे.

24 तारखेला आज दोन्ही संघ मैदानावर समोर येतील. यापूर्वी खेळल्या गेलेल्या 23 सामन्यांमध्येही खेळ बरोबरीचा होता. कोलकाताने राजस्थानपेक्षा फक्त 2 सामने जास्त जिंकले आहेत. राजस्थानने 10 सामने जिंकलेत तर, कोलकाताने 12 सामने जिंकले आहेत. भारतात आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये 18 वेळा सामने झाले. त्यामध्ये राजस्थानने 8 सामने जिंकले आणि कोलकाताने 9 सामने जिंकले आहेत.

मुंबईतील सामना म्हणजेच राजस्थानला फायदा

आज दोन्ही संघांमधील सामना हा मुंबईत होणार आहे. राजस्थान रॉयल्सला या गोष्टीमुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. पण तरीही राजस्थान रॉयल्सला त्यांच्या टॉप ऑर्डरमध्ये थोडासा बदल करावा लागणार आहे. कारण राजस्थान हा असा संघ आहे ज्याने या सीझनमध्ये आतापर्यंत पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक 10 विकेट गमावले आहेत. परंतु ते मुंबईत होणाऱ्या सामन्यात टेन्शन फ्री राहू शकतात कारण, शाहरुखच्या नाईट रायडर्सचा वानखेडे मैदानवर खूपच खराब रेकॅार्ड आहे.

वानखेडेवर कोलकाताचा खराब रेकॅार्ड

कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळल्या गेलेल्या 9 आयपीएल सामन्यांपैकी केवळ 1 सामना जिंकला आहे. कोलकाताच्या या कमकुवत नाडीवर हल्ला करून राजस्थान रॉयल्स विजयाचा मार्ग निश्चित करु शकतो. ज्याची आज सर्वात जास्त गरज आहे.