मुंबई: काही वेळा सामना सुरू असताना मैदानात दुर्घटना घडतात. नुकताच IPL दरम्यान किंग कोहलीच्या डोळ्याला बॉल लागला होता. त्यावेळी थोडक्यात दुर्घटना टळली होती. तर नुकत्याच झालेल्या पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यातही एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघातील गोलंदाजानं असा बाऊंन्सट टाकला की फलंदाजाच्या डोक्यावरच हेल्मेट तुटून खाली कोसळलं. फलंदाज मात्र अगदी थोडक्यासाठी वाचला आहे.
झिम्बाब्वेच्या डावाचा 7व्या ओव्हरमध्ये अरशद इक्बाल बॉलिंग करत होता. या ओव्हरमध्ये तिसरा बॉल इक्बालने इतका धोकादायक फेकला की झिम्बाब्वेचा फलंदाज तिनशे कामुनहुकामवेचे हेल्मेटही फुटले.
Those dreadlocks surely saved Kamunhukamwe from potential concussion after getting hit by an Arshad Iqbal bouncer #ZIMvPAK @ZimCricketv #VisitZimbabwe pic.twitter.com/3n6oxjVn8K
— Kudakwashe (@kudaville) April 23, 2021
सुदैवानं तिनशे कामुनहुकामवे याला दुखापत झाली नाही. सर्व खेळाडूंनी एकत्र येऊन त्याला नेमकं काय झालं तो ठिक आहे ना याची चौकशी केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
झिम्बाब्वे संघाने 20 ओव्हरमध्ये 9 गडी गमावून 118 धावा केल्या. त्यामध्ये कामुनहुकामवे याने सर्वाधिक म्हणजेच 34 धावा केल्या. तर पाकिस्तानचा क्रिकेट संघ 99 धावांवर ऑलआऊट झाला.दुसर्या टी-20 सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वेने 18 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
या सामन्यातील विजय झिम्बाब्वेसाठी विशेष होता कारण टी-20 क्रिकेटमध्ये या संघाने प्रथमच पाकिस्तानला पराभूत केले. झिम्बाब्वेपेक्षाही पाकिस्तानचा संघ मजबूत आहे, पण या सामन्यात यजमान संघाने पाहुण्या संघाला पराभवाचा धक्का दिला.