मुंबई: सलग दोन सामन्यांमध्ये छोबीपछाड झालेल्या हैदराबाद संघाला आज जिंकणं गरजेचं आहे. मुंबई इंडियन्स संघाचे विजयासाठी तगडं आव्हान असणार आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर हा सामना होणार आहे. हैदराबादचं आतापर्यंत कामगिरी विशेष राहिली नाही.
हैदराबादने आपल्या संघातील प्लेइंग इलेवनमध्ये काही बदल करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. केन विलियमसनला आज संधी देणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यातही हैदराबादचा दणकून पराभव झाला होता.
दुसरा सामना बंगळुरू विरुद्घ झाला होता. जिंकत आलेला सामना हैदराबाद संघाकडून बंगळुरूनं हिसकावून घेतला आहे. त्यामुळे दुसरा सामना देखील ते पराभूत झाले. आता तिसरा सामना मुंबई इंडियन्स सोबत होणार आहे. या सामन्यात जिंकणं भाग आहेच पण आव्हान देखील कडवं आहे. त्यामुळे हैदराबाद हे आव्हान कसं पेलणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विजयशंकर किंवा अब्दुलच्या जागी केदार जाधवला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भुवी आणि नटराजन या दोघांनी चांगली गोलंदाजी सांभाळली होती. तर राशिद खान आणि शाहबाज नादीमला स्पिनरसाठी संधी मिळणार आहे.
ऋद्धिमान साहा, डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), मनीष पांडे, जॉनी बेअरस्टो / केन विल्यमसन, अब्दुल समद, केदार जाधव / विजय शंकर, जेसन होल्डर, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, शाहबाज नदीम, आणि टी नटराजन
क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, मार्को जेन्सन / नाथन कुलपर नाईल, राहुल चहर, ट्रेंट बाउल्ट आणि जसप्रीत बुमराह