IPL 2021 MI vs PBKS: चेन्नईमध्ये पंजाबचा बल्ले बल्ले, 9 विकेट्सने मुंबई टीमवर दणदणीत विजय

हिटमॅन रोहित शर्माच्या संघावर के एल राहुल आणि ख्रिस गेलची जोडी भारी पडली आणि दोघांनी मिळून मैदानात तुफान आणलं.

Updated: Apr 24, 2021, 07:32 AM IST
IPL 2021 MI vs PBKS: चेन्नईमध्ये पंजाबचा बल्ले बल्ले, 9 विकेट्सने मुंबई टीमवर दणदणीत विजय title=

मुंबई: पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. तर पंजाब किंग्स संघाला पराभवाच्या हॅट्रिकनंतर विजयाची गोळी मिळाल्यानं चेपॉकवर त्यांनी आनंद साजर केला आहे. 

पंजाबने बल्ले बल्ले करत 9 विकेट्सनं मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर पॉइंट टेबलमध्ये पंजाब किंग्स पाचव्या स्थानावर पोहोचलं आहे. हिटमॅन रोहित शर्माच्या संघावर के एल राहुल आणि ख्रिस गेलची जोडी भारी पडली आणि दोघांनी मिळून मैदानात तुफान आणलं.

पंजाब संघाच्या गोलंदाजांनी 131 धावांवर मुंबई संघाला रोखलं. तर विजयासाठी पंजाबला 132 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पंजाब संघातील मोहम्मद शमी आणि रवि बिश्नोई या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

के एल राहुलने 60 तर मयंक अग्रवालनं 25 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या ख्रिस गेलनं स्फोटकी खेळी केली. 35 चेंडूमध्ये त्याने 43 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. मयंक अग्रवाल कॅच आऊट झाल्यानं केवळ 25 धावा काढून तंबूत परतला. 

ऑरेंज कॅपमध्ये के एल राहुल आणि शिखर धवन यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. सध्या दिल्ली संघाचा शिखर धवन पहिल्या स्थानावर तर दुसऱ्या स्थानावर पंजाब संघाचा के एल राहुल आहे. पंजाब संघा आतापर्यंत 5 सामने खेळला आहे. त्यापैकी 2 सामने जिंकण्यात यश आलं तर तीन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे.