मुंबई: मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्यात शेवटच्या 4 ओव्हरमध्ये गोलंदाजांनी कमाल केली. निसटता विजय खेचून आणत 10 धावांनी सामना जिंकला. रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली आहे. मुंबई इंडियन संघाच्या फलंदाजी दरम्यान सूर्यकुमार यादवनं जबरदस्त कामगिरी केली आहे.
सूर्यकुमार यादव इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये देखील चांगल्या फॉर्ममध्ये होता. तशीच ऊर्जा या सामन्यातही पाहायला मिळाली. त्याने ठोकलेल्या षटकारानं तर चाहतेच नव्हे पण संघातील अनेक खेळाडू आवासून पाहात राहिले.
सूर्यकुमार यादवनं 99 मीटर लांब षटकार ठोकला. 10 ओव्हरमध्ये ठोकलेल्या या षटकारानंतर हार्दिक पांड्याही आश्चर्यानं पाहात राहिला. हा षटकार पाहून त्याचे तोंड उघडले. हार्दिक पांड्यानं दिलेल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Reaction for SKY to The SKY #SKY #SuryakumarYadav #MIvsKKR pic.twitter.com/SOWuxwYd9y
Yadav JBS (@JBSVision) April 13, 2021
SKY! Deposited it for 99m huge SIX #MI #KKRHaiTaiyaar #MIvsKKR #SuryakumarYadav pic.twitter.com/qZ75OU8Fjx
Tausif #MI (@iamtausif5) April 13, 2021
सूर्यकुमार यादवनं 36 चेंडूमध्ये 56 धावा केल्या त्यामध्ये 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले आहेत. त्याचा तुफान अर्धशतकी खेळीचं कर्णधार रोहित शर्मानं कौतुक केलं आहे.
मुंबई इंडियन्स संघाने कोलकाता संघा विरुद्ध रोमांचक विजय मिळवला. शेवटच्या चार ओव्हर्समध्ये गोलंदाजांनी कमाल केली. हा विजम मिळाला असला तरी रोहित शर्मा मात्र थोडासा नाखूश आहे. याचं कारण म्हणजे धावसंख्या अजून काढता आली असती मात्र संघ करू शकला नाही त्यामुळे थोडी नाराजी देखील आहे.