IPL 2021 : KL Rahul चा नवा रेकॉर्ड, Virat आणि Rohit यांना टाकलं मागे

केएल राहुलने आपल्या नावे केला हा नवा रेकॉर्ड

Updated: Apr 21, 2021, 07:55 PM IST
IPL 2021 : KL Rahul चा नवा रेकॉर्ड, Virat आणि Rohit यांना टाकलं मागे title=

मुंबई : आयपीएल 2021 (IPL 2021) चा 14 वा सामना सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) आणि पंजाब किंग्ज (पीबीकेएस) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबचा संघ काही खास कामगिरी करू शकला नाही आणि 20 ओव्हरमध्ये 120 धावांवर बाद झाला. पण तरीही या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने एक मोठा विक्रम नोंदवला आहे.

या सामन्यात केवळ 4 धावा खेळणार्‍या केएल राहुलने टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय म्हणून वेगवान 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. याबाबत  राहुलने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही मागे टाकले आहे. राहुलने टी-20 क्रिकेटच्या 143 डावांमध्ये 5003 धावा केल्या आहेत. यावेळी, त्याची सरासरी 42 तर त्याचा स्ट्राइक रेट 138 आहे. लीग आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 4 शतके आणि 41 अर्धशतके झळकावली आहेत.

टी-20 मध्ये सर्वात वेगवान 5000 धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल याच्या नावावर आहे. त्याने ही कामगिरी 132 डावात केली आहे. राहुलने ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शला मागे टाकत दुसर्‍या क्रमांकावर स्थान मिळवले. मार्शने ही कामगिरी 144 डावात केली आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 20 ओव्हरमध्ये 10 विकेट गमावून 120 धावा केल्या आहेत. हैदराबादला विजयासाठी 121 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. हैदराबादकडून वेगवान गोलंदाज खलील अहमदने 21 धावा देऊन तीन गडी बाद केले. पंजाबकडून मयंक अग्रवाल आणि शाहरुख खानने 22-22 धावा केल्या.

हैदराबादने फक्त 1 विकेट गमवून हा सामना जिंकला आहे. सनराइजर्स हैदराबादकडून जॉनी बेअरस्टो याने नाबाद 63 रन केले. डेविड वॉर्नर याने 37 धावा केल्या. केन विलियम्सनने नाबाद 16 रन केले.