IPL 2021 : खराब कामगिरी करुन देखील कोटींमध्ये का विकला जातो Maxwell?

ग्लेन मॅक्सवेल कोट्यावधी रुपयात विकल्या जाण्यामागचे कारण भारतीय टीमचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी सांगितले आहे.

Updated: Apr 7, 2021, 09:12 PM IST
IPL 2021 : खराब कामगिरी करुन देखील कोटींमध्ये का विकला जातो Maxwell? title=

मुंबई : आयपीएलच्या शेवटच्या काही सीझनमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलची (Glenn Maxwell) कामगिरी खूपच खराब झाली आहे. असे असून देखील तो आयपीएलच्या लिलावात कोट्यावधी रुपयांना विकत घेतला जातो. ग्लेन मॅक्सवेल कोट्यावधी रुपयात विकल्या जाण्यामागचे कारण भारतीय टीमचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी सांगितले आहे.

आयपीएल -13 मध्ये मॅक्सवेलची कामगिरी खालावली

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आयपीएलच्या शेवटच्या सत्रात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला होता आणि त्याची कामगिरी खूपच खराब होती. ग्लेन मॅक्सवेलच्या खराब कामगिरीमुळे पंजाबने त्याला रिलीज केले आहे. यावर्षी आयपीएलच्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ग्लेन मॅक्सवेलला 14.25 कोटी रुपयांना विकत घेतले आणि याचे सर्वांनाच आश्चर्यत वाटले आहे.

कोट्यावधी रुपयांना मॅक्सवेल का विकला जातो?

गौतम गंभीरने ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) का पसंत केले जाते या मागचे कारण स्पष्ट केले आहे. गंभीरने (Gautam Gambhir) ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले की, "मॅक्सवेल कधीही कंसिस्टंट खेळलेला नाही. त्याला मुक्तपणे खेळण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही. दिल्लीत खेळत असताना त्याला बरेच स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळेत त्याने चांगली कामगिरी केली होती."

गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला, "बहुतेक आयपीएल संघ मॅक्सवेलची निवड करतात कारण त्यांना त्याच्यातील एक्स फॅक्टर दिसतो, काही तरी करुन दाखवण्याची कुवत त्याच्यामध्ये दिसचे. परंतु 2014 आयपीएल सीझन शिवाय मॅक्सवेलने चांगली कामगिरी केली नाही. मॅक्सवेलला जास्त पैसे यासाठी मिळतात कारण, ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाकडून खेळताना त्याची कामगिरी विलक्षण आहे.