मुंबई: वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. आज कोण वरचढ ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सामन्याआधी दिल्ली कॅपिटल्स संघाचे कोच रिकी पॉटिंग यांनी एक मोठं विधान केलं आहे.
दिल्ली संघाचे कोच रिकी पॉटिंग यांनी संघाचा कर्णधार ऋषभ पंतची तुलना विराट कोहली आणि केन विल्यमसनसोबत केली आहे. ही बरोबरी करताना ते म्हणतात की विराट आणि केन प्रमाणेच तोही शेवटपर्यंत क्रिझवर राहिला तर सामन्यातील बाजी पलटवण्याची ताकद ऋषभ पंतकडे आहे. शेवटपर्यंत त्यासाठी तो झटत राहातो. जे कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू विल्यमसन आपल्या संघासाठी करतात अगदी तशाच प्रकारे पंत आपले प्रयत्न अखेरपर्यंत सोडत नाही.
श्रेयस अय्यरला झालेल्या दुखापतीमुळे IPLमध्ये यंदा दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नेतृत्वाची धुरा ऋषभच्या खांद्यावर देण्यात आली आहे. चेन्नई सुपरकिंग्स सोबत झालेल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नेत्रदीपक कामगिरी केली होती. पृथ्वी शॉ आणि धवन जोडीनं तुफान फलंदाजी केली.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आज होणाऱ्या सामन्याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. यावेळी ऋषभ पंतची स्ट्रॅटजी यशस्वी होणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. वानखेडे स्टेडियमवर 7.30 वाजता सामना होत आहे.
राजस्थान रॉयल्स संभाव्य प्लेइंग इलेवन
मनन वोहरा, जोस बटलर (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, डेव्हिड मिलर, शिवम दुबे, रायन पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाळ, चेतन सकारिया आणि मुस्ताफिजुर रहमान
दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेइंग इलेवन
पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शिमरन हेटमीयर, मार्कस स्टोइनिस, ख्रिस वॉक्स, आर अश्विन, कागिसो रबाडा, अमित मिश्रा आणि अवेश खान.