दुबई: कोरोनामुळे स्थगित झालेले आयपीएलचे 31 सामने आजपासून UAE मध्ये पुन्हा रंगणार आहेत. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामन्याने होणार आहे. दोन्ही संघ एकमेकांना पराभूत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 5 वेळा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला या हंगामात पराभूत करण्यासाठी CSK टीमनं कंबर कसली आहे. सराव सामन्या दरम्यान CSKचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने तुफान फलंदाजी केली. सराव सामन्यात फुल फॉर्ममध्ये खेळणाऱ्या धोनीला पाहून MI मधील खेळाडूंना घाम फुटला असणार अशी चर्चा आहे.
धोनीच्या सराव सामन्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये धोनीने 8 षटकार ठोकले आहेत. धोनीची ही धडाकेबाज फलंदाजी सर्वांनाच आवडली. धोनीला पुन्हा फुल फॉर्ममध्ये मैदानात पुन्हा खेळताना पाहायला चाहते खूप आतूर आहेत. पहिल्या टप्प्यात धोनी फार कमी मैदानात सामन्यात खेळताना पाहायला मिळाला. आता दुसऱ्या टप्प्यात धोनी मैदानात तेवढ्याच आक्रमकतेनं खेळताना दिसणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.
All arealayum Thala...#WhistlePodu #Yellove @msdhoni pic.twitter.com/Zu85aNrRQj
— Chennai Super Kings - Mask Pdu Whistle Pdu! (@ChennaiIPL) September 18, 2021
आयपीएल 2021 च्या पॉइंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यांनी 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्याकडे 10 गुण असून 7 पैकी 5 सामने जिंकलेत. चेन्नई सुपरकिंग्सच्या ट्रेनिंग सेशनमध्ये महेंद्रसिंह धोनीनं षटकार ठोकले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेन्नई सुपरकिंग्सने आतापर्यंत 5 सामने जिंकले असून 10 गुण मिळवले आहेत.
आता चेन्नई दुसऱ्या स्थानावर तर मुंबई चौथ्या स्थानावर आहे. या दोघांमध्ये चुरशीची लढत आज होणार आहे. आयपीएल 2021चा अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी दुबईत खेळला जाईल, तर पहिला क्वालिफायर 10 ऑक्टोबर रोजी दुबईत होणार आहे. याशिवाय एलिमिनेटर आणि दुसरा क्वालिफायर अनुक्रमे 11 आणि 13 ऑक्टोबर रोजी शारजामध्ये खेळला जाईल.