IPL 2021: दीपक चहरने या बॉलरकडून सामन्यापूर्वी घेतला आशीर्वाद, फोटो व्हायरल

दीपक चहरने मैदानात केलेला कहर सर्वांनीच पाहिला असेल. पंजाबच्या फलंदाजांना रडवलं, 13 ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेणाऱ्या या चहरनं सामन्यापूर्वी कोणाचे आशीर्वाद घेतले होते? पाहा फोटो

Updated: Apr 17, 2021, 10:19 AM IST
IPL 2021: दीपक चहरने या बॉलरकडून सामन्यापूर्वी घेतला आशीर्वाद, फोटो व्हायरल title=

मुंबई: पंजाब विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स नुकताच वानखेडे स्टेडियमवर सामना झाला. चेन्नई सुपरकिंग्स संघाने पंजाबचा छोबीपछाड केली आहे. 6 विकेट्सने चेन्नईनं पंजाबवर विजय मिळवला. या सामन्यात रविंद्र जडेजा, राहुल चहर, फाफ डुप्लेसिस आणि मोईन अली या चौघांनी मिळून कालचा सामना जिंकला आहे. 

या सामन्यातील रविंद्र जडेचा आपल्या जबरदस्त फील्डिंगमुळे चर्चेत आहे. तर दीपक चहर आपल्या तुफान गोलंदाजीमुळे. त्याला गोलंदाजीसोबतच आणखी एका फोटोची चर्चा सध्या रंगली आहे. मोहम्मद शमीचे आशीर्वाद घेताना दीपक चहरचा फोटो समोर आला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Cricbuzz (@cricbuzzofficial)

संपूर्ण सामन्यात हिरो म्हणून दीपक चहरची चर्चा असताना हा फोटो समोर आला. पहिल्या म्हणजेच दिल्ली विरुद्धच्या सामन्यात त्याची कामगिरी विशेष चांगली नव्हती. मात्र पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने चार विकेट्स घेतल्या आणि कमाल केली. 

cricbuzz ने याचा फोटो सोशल मीडियावर केला आहे. दीपक चहरचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये चहार पंजाब किंग्जचा ज्येष्ठ वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे सामन्यापूर्वी आशीर्वाद घेताना दिसत आहे. दरम्यान, शमीमुळे चहारने ही उत्कृष्ट कामगिरी बजावली अशा अनेका नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेणारा आहे.