IPL 2021 साठी 8 ही संघाच्या कर्णधारांची घोषणा

आयपीएलमध्ये कोणत्या संघाची जबाबदारी कोणत्या खेळाडूवर...

Updated: Mar 31, 2021, 02:03 PM IST
IPL 2021 साठी 8 ही संघाच्या कर्णधारांची घोषणा title=

मुंबई : आयपीएल 2021 (IPL 2021) ला काही दिवसात सुरुवात होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा 14 वा हंगाम 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. यापूर्वी, आयपीएलच्या आठ फ्रेंचायझींचा कर्णधार कोण आहे हे जाणून घेऊया. क्रिकेट फॅन म्हणून कोणत्या कर्णधाराने किती ट्रॉफी जिंकल्या आणि कोणता कर्णधार बराच काळ आयपीएल ट्रॉफीसाठी प्रयत्न करतोय हे देखील पाहूया.

दोन संघांचे कर्णधार आयपीएल 2021 साठी बदलण्यात आले आहेत, तर 6 कर्णधार हे कायम आहेत ज्यांनी मागील मोसमात संघाचे नेतृत्व केले होते. राजस्थान रॉयल्सने या मोसमात संजू सॅमसनला संघाचा कर्णधार म्हणून नेमले आहे, कारण 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाचा अनुभवी स्टीव्ह स्मिथला संघाने रिलीज केलं होतं. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ही यंदा बदलला आहे. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी ऋषभ पंतला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दिल्ली कॅपिटल्सने (DC) युवा विकेटकीपर ऋषभ पंतला (Rishabh pant) संघाची जबाबदारी दिली. तो आयपीएलमध्ये पहिल्यांदा कर्णधार म्हणून दिसणार आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) कर्णधार इयोन मॉर्गनवर (Eoin Morgan) विश्वास कायम ठेवला आहे. ज्याने 2020 च्या अर्ध्या मोसमानंतर संघाचं कर्णधारपद स्वीकारलं होतं. त्याचबरोबर, एमएस धोनी नेहमीप्रमाणे चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार असेल, तर पंजाब किंग्जचा (Punjab Kings) कर्णधार केएल राहुल असेल, जो मागील हंगामातही संघाचं नेतृत्व करत होता.

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians)त्याचा पाच वेळा आयपीएल चॅम्पियन कर्णधार रोहित शर्मावर विश्वास कायम ठेवला आहे. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers hyderabad) पुन्हा डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) नेतृत्वात खेळेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) पुन्हा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात खेळेल. अशा प्रकारे आयपीएलच्या नवीन हंगामात केवळ दोन संघ नवीन कर्णधारांसह मैदानात उतरतील, तर दोन संघांचे कर्णधार परदेशी आहेत, त्यातील एक डेव्हिड वॉर्नर आणि दुसरा कर्णधार इयोन मॉर्गन आहे.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. ज्याला 177 सामन्यांमध्ये नेतृत्वाचा अनुभव आहे. धोनीने 105 सामने जिंकले आहेत, तर 71 सामने गमावले आहेत. एक सामना अनिश्चित ठरला आहे. दुसर्‍या क्रमांकावर विराट कोहली असून त्याने आरसीबीसाठी 112 सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे. ज्यापैकी 50 सामने त्याने जिंकले आहेत तर 56 सामन्यात संघाचा पराभव झाला आहे. त्याच 2 सामने बरोबरीत आहेत आणि 4 सामने अनिर्णीत ठरले आहेत.

तिसर्‍या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. त्याने 106 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून नेतृत्व केलं आहे, त्यातील 61 सामने संघाने जिंकले आहेत, तर 43 सामने संघाने गमावले आहेत. दोन सामने टाय झाले आहेत. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरकडे 63 सामन्यांचा अनुभव आहे. ज्यापैकी त्याने 34 सामने जिंकले आहेत. तर 28 सामने गमवले आहेत. एक सामना टाय झाला आहे. पाचव्या क्रमांकावर केएल राहुल आहे. त्याने 14 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि सात सामने गमावले आहेत. एक सामना टाय देखील झाला आहे.

मॉर्गनने कर्णधार म्हणून केकेआरसाठी सात सामने खेळले आहेत. ज्यापैकी 2 सामने जिंकले आहेत आणि 4 सामने गमावले आहेत. एक सामना बरोबरीत सूटला आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत यांना कर्णधार म्हणून एकाही सामन्याचा अनुभव नाही.