म्हणून मुंबईने बोल्ट-कुलकर्णीला टीममध्ये घेतलं, झहीरचा खुलासा

आयपीएलच्या पुढच्या मोसमासाठीची तयारी जोरदार सुरु आहे.

Updated: Nov 18, 2019, 08:01 PM IST
म्हणून मुंबईने बोल्ट-कुलकर्णीला टीममध्ये घेतलं, झहीरचा खुलासा title=

मुंबई : आयपीएलच्या पुढच्या मोसमासाठीची तयारी जोरदार सुरु आहे. प्रत्येक टीमनी बहुतेक खेळाडूंना कायम ठेवलं आहे, तर काही खेळाडूंना सोडून दिलं आहे. काही टीमनी तर त्यांच्या खेळाडूंना दुसऱ्या टीममध्ये पाठवलं आहे. २०१९ ची आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सने ट्रेन्ट बोल्ट आणि धवल कुलकर्णीला टीममध्ये घेतलं आहे. मुंबईने बॉलिंग आणखी मजबूत करण्यासाठी या दोघांना टीममध्ये घेतल्याचं मुंबई इंडियन्सचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स झहीर खान म्हणाला आहे.

काही गोष्टी बदलल्या आहेत. पुढचा मोसम वेगळा असेल. आता लिलावात कोणत्या खेळाडूंना विकत घ्यायचं, याकडे लक्ष लागलं आहे, अशी प्रतिक्रिया झहीरने दिली आहे. टीमचे महत्त्वाचे खेळाडू कायम आहेत. पण हार्दिक पांड्याच्या आणि जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली आहे. जेसन बेहरनडॉर्फही पाठदुखीमुळे आयपीएल खेळू शकणार नाही, असं वक्तव्य झहीरने केलं.

आयपीएल ट्रेडमध्ये मुंबईने दिल्लीकडून ट्रेन्ट बोल्टला, शेरफन रदरफोर्डला आणि राजस्थानकडून धवल कुलकर्णीला मुंबईच्या टीममध्ये घेतलं आहे. मुंबईने एकूण १८ खेळाडूंना कायम ठेवलं, तर १२ खेळाडूंना सोडून दिलं आहे.

मुंबईने कायम ठेवलेले खेळाडू

रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, आदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डिकॉक, कायरन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅकलेनघन

मुंबईने टीममध्ये घेतलेले खेळाडू

ट्रेन्ट बोल्ट (दिल्ली), शेरफन रदरफोर्ड (दिल्ली), धवल कुलकर्णी (राजस्थान)

मुंबईने सोडलेले खेळाडू

एव्हिन लुईस, एडम मिलने, जेसन बेहरनडॉर्फ, ब्युरन हेन्ड्रिक्स, बेन कटिंग, युवराज सिंग, बरिंदर सरन, रसिक सलाम, पंकज जयस्वाल, अल्झारी जोसेफ

मुंबईने दुसऱ्या टीमला दिलेले खेळाडू

मुंबईने मयंक मार्कंडेला सुरुवातीला दिल्लीच्या टीमला दिलं, पण आता दिल्लीच्या टीमने त्याला राजस्थानच्या टीमला दिलं आहे. तर सिद्धेश लाडला मुंबईने कोलकात्याला दिलं आहे.