दुबई : आयपीएल २०२० मधून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बाहेर झाली आहे. यावर सुनील गावस्कर यांची प्रतिक्रिया आली आहे. माजी भारतीय कर्णधार म्हणाले की, कोहली अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. विशेष म्हणजे सनरायझर्स हैदराबादकडून झालेल्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीला शुक्रवारी सहा गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतरच गावस्करांची ही प्रतिक्रिया आली आहे.
गावस्कर म्हणाले की, 'विराट कोहलीने स्वत:साठी उच्च दर्जा ठरवला आहे. पण कदाचित त्याची कामगिरी तशी नव्हती. हेच कारण होते की आरसीबी पुढे जाऊ शकला नाही. जेव्हा एबी डिव्हिलियर्सने मोठ्या धावा केल्या तेव्हा संघाला यश मिळालं.' या मोसमात विराटने 15 सामन्यांत 450 धावा केल्या. या दरम्यान, त्याचा स्ट्राईक रेट 121.35 होता. त्याचा संघ मिडल ओव्हर्समध्ये खूप संघर्ष करताना दिसला.
आरसीबीची गोलंदाजी हा त्याचा कमकुवत दुवा असल्याचे गावस्करांनी म्हटले आहे. या संघात टी-२० चे चांगले खेळाडू आहेत, फिंच, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स. याचा अर्थ असा की आपल्याकडे चांगली टीम आहे. आरसीबीला फिनिशरची भूमिका बजावू शकेल असा एखादा खेळाडू शोधावा लागेल. शिवम दुबे कदाचित त्या भूमिकेत योग्य असू शकतो असं देखील गावस्करांनी म्हटलं आहे.
गावस्कर म्हणाले की, 'मला वाटते त्यांना थोडा विचार करण्याची गरज आहे. शिवम दुबेला योग्य भूमिकेत घेण्याची गरज आहे. दुबे खाली गेला आहे. जर त्यांना एखादी भूमिका दिली गेली आणि मैदानावर फटकेबाजी करण्यास सांगितले तर त्यांना मदत होऊ शकते. ते सध्या गोंधळलेले आहेत. संघाला पाचव्या क्रमांकावर एक भक्कम खेळाडू मिळाल्यास डिव्हिलियर्स आणि विराटवरील दबाव कमी होईल.'