IPL 2020: देवदत्त पडिक्कलने संधीचं केलं सोनं, मोडले हे रेकॉर्ड

देवदत्त पडिक्कलने धवन आणि श्रेयस अय्यरला टाकलं मागे

Updated: Nov 2, 2020, 10:53 PM IST
IPL 2020: देवदत्त पडिक्कलने संधीचं केलं सोनं, मोडले हे रेकॉर्ड title=

दुबई : आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने उपकर्णधार पार्थिव पटेलच्या ऐवजी पहिल्या सामन्यात देवदत्त पडिक्कलला सलामीवीर म्हणून निवडले. पडिक्क्कलनेही आरसीबी मॅनेजमेंट आणि कर्णधार विराट कोहलीला निराशा केले नाही. पडिक्क्कलने त्याच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्यानंतर त्याने आणखी बरेच दमदार डाव खेळले. आरसीबीसाठी शेवटच्या साखळी सामन्यातही त्याने पुन्हा एकदा अर्धशतक झळकावून इतिहास घडविला.

खरं तर, देवदत्त पडिक्कल आयपीएलच्या इतिहासात एका मोसमात सर्वाधिक अर्धशतकं ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. पडिक्कल हा अऩकॅप्ड खेळाडू आहे. शिखर धवन आणि श्रेयस अय्यरला मागे सोडत स्पर्धेत त्याने आपले पाचवे अर्धशतक झळकावले. 2008 मध्ये शिखर धवनने दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून 4 अर्धशतकांचा डाव खेळला होता. शिखरने त्यावेळी भारताकडून पदार्पण केले नव्हते.

2015 मध्ये श्रेयस अय्यरने दिल्ली संघासाठी 4 अर्धशतक ठोकले होते आणि आता देवदत्त पद्धिकलने पाच अर्धशतक ठोकत हा विक्रम मोडला आहे. आयपीएलमध्ये तीनही फलंदाजांनी 4 किंवा अधिक अर्धशतके तेव्हा झळकावली आहेत. जेव्हा त्यांचा भारतीय संघात समावेश ही झाला नव्हता. या सामन्यात पडिक्कलने दिल्ली कॅपिटलस विरूद्ध 40 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, परंतु 41 व्या चेंडूवर मोठा शॉट खेळताना तो आऊट झाला.

विशेष म्हणजे, घरगुती क्रिकेटमधील मजबूत कामगिरीच्या जोरावर आरसीबीने त्याला आयपीएल 2020 साठी संघात घेतले. देवदत्त पडिक्कलने संघाच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या. पडिक्कलने आयपीएलच्या 13 व्या सत्रात लीग टप्प्यापर्यंत आरसीबीसाठी 14 सामने खेळले आणि या सामन्यात 472 धावा केल्या. या दरम्यान त्याने 5 अर्धशतके झळकावली. त्याने 33 पेक्षा अधिक सरासरीने या स्पर्धेत धावा केल्या आहेत, परंतु स्ट्राइकरेट 126.54 आहे. या स्पर्धेत आतापर्यंत त्याने 51 फोर मारले आहेत.