IPL 2020: दिल्लीचा हैदराबादवर दणदणीत विजय, पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश

दिल्लीचा संघ प्रथमच आयपीएलच्या इतिहासात फायनलमध्ये

Updated: Nov 8, 2020, 11:36 PM IST
IPL 2020: दिल्लीचा हैदराबादवर दणदणीत विजय, पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश title=

दुबई : इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या क्वालिफायर 2 मध्ये दिल्ली कॅपिटलने सनरायझर्स हैदराबादचा 17 धावांनी पराभव केला. या विजयासह दिल्लीचा संघ प्रथमच आयपीएलच्या इतिहासात फायनलमध्ये पोहोचली आहे. दिल्लीने पाचव्या वेळी प्लेऑफ / सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी चार वेळा तो विजेतेपदापर्यंत पोहोचू शकले नव्हते. दिल्लीने हैदराबादला प्लेऑफमधून बाद केले.

केन विल्यमसनने 45 बॉलमध्ये 67 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 फोर आणि 4 सिक्स मारले. त्याआधी कॅगिसो रबाडाने कर्णधार डेव्हिड वॉर्नरला आऊट केले. त्याने 3 बॉलमध्ये 2 रन केले. पाचव्या ओव्हरमध्ये प्रियाम गर्ग (17) आणि मनीष पांडे (21) यांना मार्कस स्टॉयनिसने बाद केले. जेसन होल्डर अकबर पटेलच्या बॉलवर 11 रनवर आऊट झाला.

दिल्लीकडून शिखर धवनने 78 रन केले. शेवटी शिमरॉन हेटमायरने नाबाद 42 रनची खेळी केली. मार्कस स्टोइनिसने 38 आणि श्रेयस अय्यरने 21 रन केले. ऋषभ पंत 2 रनवर नाबाद राहिला. हैदराबादकडून संदीप शर्मा, जेसन होल्डर आणि राशिदने एक-एक विकेट घेतली.