IPL 2020: चेन्नईला मोठा झटका, हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर

चेन्नईचं संकट आणखी वाढलं...

Updated: Oct 22, 2020, 08:42 AM IST
IPL 2020: चेन्नईला मोठा झटका, हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर title=

दुबई : चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक धक्का बसला आहे. संघातील महत्त्वाचा ऑलराऊंडर दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाला आहे. ड्वेन ब्राव्हो आयपीएल 2020 च्या सध्याच्या हंगामातून बाहेर पडला आहे. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कासी विश्वनाथन यांनी सांगितले आहे की ब्राव्होच्या उजव्या मांडीला दुखापत झाल्याने तो आपल्या देशात परत जाईल.

17 ऑक्टोबर रोजी दिल्ली कॅपिटलबरोबर झालेल्या सामन्यादरम्यान 37 वर्षीय ब्राव्होला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पुढील सामन्यात खेळू शकला नाही. सीएसकेने तो सामना 7 विकेटने गमावला.

या हंगामात ब्राव्होने सीएसकेसाठी फक्त 6 सामने खेळले आणि 7 धावा करण्याव्यतिरिक्त 6 विकेट्स घेतल्या. या मोसमातील चेन्नई संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे. संघाने 10 पैकी केवळ 3 सामने जिंकले आहेत. सध्या चेन्नई सर्वात खालच्या स्थानावर आहे. शुक्रवारी सीएसकेचा सामना मुंबई इंडियन्सशी शारजाह येथे होणार आहे.