नवीन वर्षात भारत आणि इंग्लंड मध्ये होणार डे-नाईट टेस्ट सीरीज

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची माहिती

Updated: Oct 21, 2020, 12:46 PM IST
नवीन वर्षात भारत आणि इंग्लंड मध्ये होणार डे-नाईट टेस्ट सीरीज title=

कोलकाता : भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारत-इंग्लंड यांच्यातील सिरीजची घोषणा केली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच इंग्लंडटची टीम भारत दौर्‍यावर येणार असून अहमदाबाद येथे डे-नाईट टेस्ट सामने होणार आहेत.

इंग्लंडची टीम पुढच्या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत पाच कसोटी आणि मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. कोविड -१९ मुळे ही सीरीज यूएईमध्येच होण्याची शक्यता होती. पण सौरव गांगुली म्हणाले की, 'अहमदाबाद येथे डे-नाईट टेस्ट आयोजित केली जाईल.'

बीसीसीआय देशात इंग्लंड सोबत सीरीजचं आयोजन करण्यास वचनबद्ध आहे. अहमदाबाद, धर्मशाला आणि कोलकाता येथे कसोटी मालिकेचे सामने होऊ शकतात. पण गांगुली यांनी म्हटलं की, अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आम्ही त्याआधी काही योजना तयार केल्या आहेत पण अद्याप निर्णय झालेला नाही. अजून चार महिने बाकी आहेत'.

बीसीसीआय अध्यक्ष म्हणाले की, त्यांची प्राथमिकता आगामी ऑस्ट्रेलिया दौरा आहे ज्यासाठी काही दिवसांत या संघाची निवड केली जाईल. इंग्लंडपूर्वी ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिका आहे. यासाठी काही दिवसात संघ निवडला जाईल. आयपीएलनंतर त्वरित कसोटीच्या रूपात खेळाडूंना अनुमती देण्यात कोणतीही अडचण येणार नाही.'

बीसीसीआयने १ जानेवारीपासून रणजी करंडक सुरू करण्याचा निर्णय घेतला असून आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर चर्चा होईल, असे गांगुली यांनी सांगितले.