IPL 2019 : आयपीएल फायनलआधी रोहित शर्मा पत्नी-मुलीसोबत बालाजीच्या दर्शनाला

२०१९ सालच्या आयपीएलची फायनल १२ मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

Updated: May 9, 2019, 10:35 PM IST
IPL 2019 : आयपीएल फायनलआधी रोहित शर्मा पत्नी-मुलीसोबत बालाजीच्या दर्शनाला title=

तिरुपती : २०१९ सालच्या आयपीएलची फायनल १२ मे रोजी खेळवण्यात येणार आहे. यासाठी मुंबईची टीम हैदराबादमध्ये दाखल झाली आहे. पण मुंबई टीमचा कर्णधार रोहित शर्मा हा त्याची पत्नी आणि मुलीसह तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेला होता. रोहित शर्माबरोबरच भारतीय टीमचा खेळाडू दिनेश कार्तिकनेही बालाजीचं दर्शन घेतलं. 

७ मेरोजी चेन्नईविरुद्ध झालेल्या पहिल्या क्वालिफायर मॅचमध्ये मुंबईने चेन्नईचा पराभव केला. यामुळे मुंबईने थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवला. तर एलिमिनटेर मॅचमध्ये दिल्लीने हैदराबादला पराभूत केलं. यामुळे आता चेन्नई आणि दिल्ली यांच्यामध्ये क्वालिफायरचा दुसरा सामना खेळवण्यात येईल. या मॅचमध्ये ज्यांचा विजय होईल, ती टीम फायनलमध्ये मुंबईविरुद्ध खेळेल. 

आयपीएल संपल्यानंतर भारतीय टीम वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला रवाना होईल. रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक हे भारताच्या वर्ल्ड कप टीमचे सदस्य आहेत. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होईल. वर्ल्ड