IPL 2019: ...तर मुंबई इतिहास घडवणार! रोहितही विक्रम करणार

आयपीएलच्या पहिल्या प्ले ऑफमध्ये मुंबईने चेन्नईचा पराभव करून फायनल गाठली आहे.

Updated: May 8, 2019, 12:01 AM IST
IPL 2019: ...तर मुंबई इतिहास घडवणार! रोहितही विक्रम करणार title=

चेन्नई : आयपीएलच्या पहिल्या प्ले ऑफमध्ये मुंबईने चेन्नईचा पराभव करून फायनल गाठली आहे. मुंबईची आयपीएलच्या १२ मोसमातली ही पाचवी फायनल आहे. सर्वाधिक फायनल गाठणारी मुंबई ही दुसरी टीम आहे. आत्तापर्यंत चेन्नईने सर्वाधिक ७ वेळा आयपीएल फायनल गाठली आहे, तर बंगळुरूच्या टीमला ३ वेळा फायनमध्ये प्रवेश मिळाला आहे.

सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा रेकॉर्ड सध्या मुंबई आणि चेन्नईच्या नावावर आहे. मुंबईने २०१३, २०१५ आणि २०१७ साली आयपीएलवर आपलं नाव कोरलं होतं. तर चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ साली आयपीएल जिंकली आहे. यानंतर कोलकाता, हैदराबादने २ वेळा आणि राजस्थानने एकवेळा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. 

१२ मे रोजी होणाऱ्या फायनमध्ये मुंबईचा विजय झाला तर मुंबई आणि रोहित शर्मा ४ वेळा आयपीएल जिंकण्याचा विक्रम करतील.

आयपीएल जिंकणाऱ्या टीम

२००८- राजस्थान 

२००९- हैदराबाद

२०१०- चेन्नई

२०११- चेन्नई

२०१२- कोलकाता 

२०१३- मुंबई

२०१४- कोलकाता

२०१५- मुंबई 

२०१६- हैदराबाद 

२०१७- मुंबई 

२०१८- चेन्नई