चेन्नई : आयपीएलच्या १२व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मोसमातली पहिली मॅच गतविजेती चेन्नई आणि बंगळुरूमध्ये होणार आहे. याआधी चेन्नई टीमचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी कर्णधार धोनीची भूमिका स्पष्ट केली आहे. 'धोनीने मागच्या वर्षी चौथ्या क्रमांकावर बॅटिंग केली होती. या वर्षीही तो चौथ्या क्रमांकावरच खेळेल. मागच्या १० महिन्यांपासून धोनी शानदार फॉर्ममध्ये आहे. तसंच केदार जाधवच्या रुपात आमच्याकडे उत्कृष्ट बॅट्समनही आहे. आम्ही आमच्या बॅटिंगबद्दल खुश आहोत.'
मागच्या वर्षी आयपीएल जिंकण्याचं श्रेय फ्लेमिंग यांनी टीमची मानसिकता, टीममधलं वातावरण आणि टीमचं संतुलन यांना दिलं.
फ्लेमिंग म्हणाले, 'जर तुम्ही दुसऱ्या टीमकडे बघाल, तर तुम्हाला तुमच्या चांगल्या आणि कमकुवत बाजू दिसतील. प्रत्येक टीमकडे चांगले खेळाडू आहेत. फरक हा फक्त मानसिकता, टीममधलं वातावरण आणि मोठ्या क्षणी मॅच जिंकणं यामध्येच आहे.'