IPL 2019 | मुंबईच्या विजयाने प्ले-ऑफच्या शर्यतीत आणखी चुरस

प्ले-ऑफच्या प्रवेशासाठी चुरस

Updated: May 4, 2019, 10:50 AM IST
IPL 2019 | मुंबईच्या विजयाने प्ले-ऑफच्या शर्यतीत आणखी चुरस  title=

मु्ंबई : हैदराबाद विरुद्ध मुंबई यांच्याच सामना खेळण्यात आला. या सामन्यात मु्ंबईने हैदराबादचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. या विजयामुळे मुंबईने प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. प्ले-ऑफमध्ये पोहचणारी मुंबई तिसरी टीम ठरली आहे.

प्ले-ऑफसाठी केवळ एकच जागा शिल्लक आहे. त्यामुळे आता हैदराबाद, कोलकाता, पंजाब यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. या तीन्ही टीमने उर्वरित मॅच जिंकल्या तरी त्यांना पॉईंटसच्या आधारावर प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरता येणार नाही. त्यामुळे ज्या टीमचे पॉईंट आणि नेट रनरेट जास्त असेल, तीच टीम प्ले-ऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरेल.

मुंबईने हैदराबादचा २ मे ला पराभव केला. यामुळे प्ले-ऑफच्या समीकरणात आणखी फेरबदल झाले आहेत. प्ले-ऑफमध्ये पोहचण्यासाठी हैदराबादला मुंबई विरुद्ध झालेली आणि पुढील उर्वरित मॅच जिंकणे गरजेचे झाले होते. परंतु मुंबई विरुद्ध पराभवामुळे हैदराबादचे समीकरण बदलले आहे. हैदराबादचा नेट रनरेट हा त्यांचा जमेची बाजू आहे.

हैदराबादने आतापर्यंत या पर्वात १३ मॅच खेळल्या आहेत. त्यापैकी ६ मॅचमध्ये विजय तर ७ मॅचमध्ये पराभव झाला आहे. हैदराबाद १२ पॉईंटसह अंकतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचा रनरेट + 0.653 इतका आहे. जो की इतर सर्व टीमच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे चांगल्या रनरेटमुळे हैदराबादचे प्ले-ऑफमध्ये पोहचण्याची शक्यता जास्त आहे.

राजस्थान, कोलकाता आणि पंजाब या टीम अनुक्रमे ५ व्या, ६ व्या आणि  ७ व्या क्रमांकावर आहेत. राजस्थानने 13 मॅच खेळल्या आहेत. त्यापैकी 5 मध्ये विजय मिळवला आहे. तर 7 मॅचमध्ये पराभव झाला आहे. तर बंगळुरु आणि राजस्थान यांच्यात झालेल्या मॅचदरम्यान पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द करावा लागला. यामुळे या दोन्ही संघाना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. राजस्थानचा नेट रनरेट हा -0.321 इतका आहे.

कोलकाता आणि पंजाब या 2 टीमने प्रत्येकी 12 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये दोन्ही टीमचा 5 मॅचमध्ये विजय तर 7 मॅचमध्ये पराभव झाला आहे. दोन्ही टीमचे 10 पॉईंट आहेत. या दोन्ही टीम अजून 2 मॅच खेळणार आहे. 

पंजाबच्या तुलनेत कोलकाताचा नेट रनरेट हा फार चांगला आहे. कोलकाताचा नेट रनरेट +0.100 इतका आहे. तर पंजाबचा रनरेट हा -0.296 इतका आहे. त्यामुळे कोलकाताने उर्वरित 2 मॅच चांगल्या फरकाने जिंकल्या तर त्यांना प्ले-ऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे.
 
हैदराबादची प्ले-ऑफमध्ये पोहचण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्याचे कारण त्यांचा रनरेट. त्यामुळे आता पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.