मुंबई : शाकिब उल हसननं टी-२० मध्ये ३०० बळी घेण्याचा विक्रम केलाय. मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्यानं हा पराक्रम केला. रोहित शर्मा याची विकेट घेत शाकिब उल हसन याने आपल तीनशेवा बळी घेण्याचा विक्रम केलाय. त्याच्याआधी ड्वेन ब्राव्हो, लसिथ मलिंगा, सुनील नरेन आणि शाहिद आफ्रिदीनं अशी कामगिरी केलीय.
दरम्यान, बांग्लादेशचा खेळाडू आणि ऑलराऊंडर शाकिब अल हसन याच्यावर त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले होते. त्यानंतर तो एकदम प्रसिद्धीच्या झोतात आला. कथित लैंगिक प्रकरणाचा त्याच्यावर आरोप करण्यात आला. पोलिसांनी एक व्यावसायिकाच्या मुलाला अटक केली होती.
याआधी कोलकाता संघाकडून तो खेळाला आहे. इंग्लंड काऊंटी क्रिकेट खेळताना शाकिब आणि उम्मीची भेट झाली. उम्मी आणि शाकिब यांची भेट २०१० रोजी झाली. दोन वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर २०१२ रोजी विवाह केला. हे लग्न ढाकामधील एका हॉटेलमध्ये झाले. यावेळी अनेक बांग्लादेशातील मोठ मोठ्या व्यक्ती उपस्थित होत्या.
उम्मी ही १० वर्षांची असताना तिचे आई-वडील अमेरिकेत शिफ्ट झालेत. उम्मी ही सगळ्यात लहान. तिला पाच भाऊ आहेत. उम्मी ही बांग्लादेशी अमेरिकन विद्यार्थी आहे. अमेरिकेत मिनेसोटामध्ये शिक्षण घेतले आहे.