टीम इंडियाने विजय मिळवताच विराट करणार धोनीच्या रेकॉर्डची बरोबरी

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसरी वन-डे मॅच जिंकल्यास टीम इंडिया सीरिज आपल्या खिशात घालेल. त्यासोबतच कॅप्टन विराट कोहली याच्या नावावर एक रेकॉर्ड होणार आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 24, 2017, 01:42 PM IST
टीम इंडियाने विजय मिळवताच विराट करणार धोनीच्या रेकॉर्डची बरोबरी title=
File Photo

इंदूर : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसरी वन-डे मॅच जिंकल्यास टीम इंडिया सीरिज आपल्या खिशात घालेल. त्यासोबतच कॅप्टन विराट कोहली याच्या नावावर एक रेकॉर्ड होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच वन-डे मॅचेसपैकी पहिल्या दोन मॅचेस टीम इंडिया जिंकली आहे. आता तिसरी वन-डे मॅच जिंकत भारत आपली विजयी घौडदोड कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे.

विराट कोहलीच्या कॅप्टनशीपमध्ये ही मॅच जिंकल्यास माजी कॅप्टन एम एस धोनीच्या रेकॉर्डची बरोबरी होणार आहे. विराट कोहलीच्या कॅप्टनशीपमध्ये टीम इंडियाने सलग ८ वन-डे मॅचेस जिंकल्या आहेत. तर, २००८-०९ दरम्यान धोनीच्या कॅप्टनशीपमध्ये टीम इंडियाने सलग ९ वन-डे मॅचेस जिंकल्या होत्या.

म्हणजेच जर टीम इंडियाने इंदूर मॅच जिंकली तर विराटच्या कॅप्टनशीपमध्ये टीम इंडिया सलग ९ मॅचेस जिंकेल. त्यामुळे विराट कोहली हा धोनीच्या रेकॉर्डची बरोबरी करेल.

कोलकाता येथे झालेली वन-डे मॅच जिंकल्यानंतर विराट कोहलीने ३७ मॅचेसमध्ये २९ मॅचेस जिंकल्या आहेत. तर, ७ मॅचेसमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आणि १ मॅच ड्रॉ झाली.