चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव

न्युझीलंडच्या गोलंदाजीपुढे भारतीय संघाचा डाव कोसळला... 

Updated: Jan 31, 2019, 11:17 AM IST
चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव title=

हॅमिल्टन:  भारत विरुद्ध न्युझीलंड एकदिवसीय मालिका भारताने खिशात घातली आहे. परंतु चौथा एकदिवसीय सामना भारताने गमवला आहे. न्युझीलंड संघाकडून संयमी कामगिरी करत रॉस टेलर (३७) आणि हेनरी निकोल्स (३०) यांनी संघाला  ८ विकेट्स राखून विजय मिळवून दिला आहे. 

 संघाचे २ विकेट पडूनही याचा दबाव न्युझीलंडच्या फलंदाजावर पडलेला दिसत नाही. रॉस टेलर आणि हेनरी निकोल्स संयमी खेळी करत न्युझीलंड संघाला विजयाकडे घेवून जात आहेत.  न्युझीलंड ६४/ २ (१२ ओव्हर)

९३ धावांचा पाठलाग करताना न्युझीलंड संघाचा दुसरी विकेट पडली आहे. न्युझीलंड संघाचे कर्णधार विलियमसन्सला भुवनेश्वर कुमारने माघारी धाडले. विलियमसन्सने १८ चेंडूचा सामना करत ११ धावा केल्या. न्युझीलंड ४५/२ (८ ओव्हर)

भारत आणि न्युझीलंडमध्ये सुरु असलेला सामन्यात भारताला न्यझीलंडचा पहिली विकेट मिळवण्याचे यश हाती आले आहे.  न्युझीलंड संघाला चांगली सुरुवात करुन देणार मार्टिन गप्टिल बाद झाला आहे.  भुवनेश्वर कुमारने गप्टिलला हार्दिक पांड्याच्या हातात झेल देण्यास भाग पाडले. न्युझीलंड : 14/1 (1 ओव्हर)

न्युझीलंड संघाचे कर्णधार केन विलियमसनने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्युझीलंडच्या संघात तीन बदल केले आहे. मुनरो, साउदी आणि लॉकी फग्युर्सन खेळणार नाहीत. त्यांच्या जागेवर जेम्स नीशाम टॉड एस्टल, मॅट हेनरी यांना चौथ्या संघात स्थान मिळाले आहे. 

भारतीय संघाने पहिल्या ३ सामन्यात विजय मिळवून मालिका आपल्या नावावर केली आहे. न्युझीलंड संघाला क्लीन स्पीपपासून वाचण्यासाठी मोठे आव्हान आहे. तसेच घरातील मैदानात उत्तम रेकार्ड असूनही न्युझीलंड संघ कमजोर दिसू लागले आहे. मालिकेतील शेवटच्या २ सामन्यात विजय मिळवण्यासाठी न्युझीलंड संघ प्रयत्न करेल.  

संघ

भारत:  रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केदार जाधव, अंबादी रायडू, दिनेश कार्तिक,  शुभमन गिल, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव,  भुवनेश्वर कुमार, खलील अहमद.

न्युझीलंड: केन विलियम्सन (कर्णधार), हेनरी निकोल्स, रॉस टेलर, टाम लाथम, मार्टिन गुप्टिल, कोलिन डि ग्रैंडहोम, ट्रेंट बोल्ट,  जेम्स नीशाम टॉड एस्टल,  मैट हेनरी,  ईश सोढ़ी, मिचेल सैंटनेर.