मुंबई : भारतीय क्रिकेट संघ आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणार आहे. 17 डिसेंबरपासून पहिली टेस्ट सुरु होणार आहे. या दौऱ्यात एकूण 4 टेस्ट सामने खेळले जाणार आहेत. डे-नाईट हा सामना होणार आहे. एका रिपोर्ट नुसार एडिलेड ओवलमध्ये गुलाबी रंगाच्या बॉलने हा सामना होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बॉक्सिंग डे टेस्ट 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंड होणार आहे.
दुसर्या आणि तिसर्या कसोटी दरम्यान एका आठवड्याच्या अंतरासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारतीय क्रिकेट बोर्डाची विनंती मान्य केली आहे. तिसरा कसोटी सामना सिडनी येथे 7 जानेवारीपासून तर शेवटचा कसोटी सामना 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे खेळला जाईल.
कसोटी सामन्यापूर्वी वनडे आणि टी-20 सिरीज देखील खेळणार आहे. वनडे सामने हे 26, 28 आणि 30 नोव्हेंबरला ब्रिसबेन तर टी-20 सामने 4, 6 आणि 8 डिसेंबरला एडीलेड ओवलमध्ये खेळले जाण्याची शक्यता आहे.
कोरोना वायरसमुळे सीरीज दरम्यान नियमांचं पालन केलं जाणार आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला बायो बबलचे नियम पाळावेच लागणार आहेत. ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर खेळाडूंना क्वारंटाईन काळ पूर्ण करावा लागणार आहे.